PCMC Bharti 2025 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये (Pimpri Chinchwad Municipal Corporation) विविध पदांसाठी भरतीच्या नवीन जाहिराती प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्जाचा नमुना व इतर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
उमेदवाराने संपूर्ण जाहिरात व्यवस्थित रित्या वाचावी आणि पात्रता धारण करत असल्यास अर्ज सादर करावा,12 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत,ही भरती प्रक्रिया पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षणविभागामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 या कालावधीसाठी मराठी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये होणार आहे.
पदांचा तपशील व इतर माहिती
- कला शिक्षक – 38 जागा
शैक्षणिक पात्रता
- कला शिक्षक पदविका (एटीडी) शासकीय पदविका (जीडी) कला कला ललित कला पदवीधर (बीएफए) मास्टर ऑफ ललित कला (एमएफए) अभ्यासक्रम उत्तीर्ण.
इतर निकष
- सदरची जाहिरात व अर्जाचा नमुना महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल, जाहिरातीनुसार कार्यवाही करणे अथवा प्रक्रिया कोणत्याही स्तरावर रद्द करण्याचा अंतिम निर्णय माननीय आयुक्त मनपा यांचा राहील.
- नियुक्तीच्या वेळी उमेदवारास रक्कम रुपये 500 स्टॅम्प पेपरवर मनपा सेवेत भविष्यात नोकरी बाबतचा कोणताही हक्क राहणार नाही तसेच न्यायालयात दाद मागण्याचा मागणार नाही याबाबतच हमीपत्र/करारनामा सादर करणे बंधनकारक आहे.
- उमेदवाराने आपल्या अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, धारण केलेली शैक्षणिक अर्हता, कोर्स उत्तीर्ण किंवा चित्रकला विषयातील समक्ष पदविका व पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रक, अनुभव प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्र व कागदपत्रांच्या सत्यप्रती सादर करणे बंधनकारक राहील.
नोकरी ठिकाण Pimpri Chinchwad Municipal Corporation
- पिंपरी, पुणे.
इतर आवश्यक सूचना (PCMC Bharti 2025)
- उमेदवाराने अर्ज जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यातच सादर करायचे आहेत, अर्ज 12 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10:00 ते सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत समक्ष दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.
- सदरची निवड ही कला शिक्षक पदासाठी केवळ तात्पुरत्या एकत्रित मानधनावर हंगामी स्वरूपाची आहे. उमेदवारास मनपा सेवेत राहण्याचा अधिकार मागता येणार नाही. सदरचे पद हे शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ या करीता व आवश्यकतेनुसार राहील.
- निवड झालेल्या उमेदवारास एकत्रित मानधना व्यतिरीक्त मनपा मार्फत देण्यात येणाऱ्या कोणत्याही सोयी सुविधा हक्क व इतर आर्थिक लाभ व भत्ते देय राहणार नाहीत. (उदा. दिवाळी बोनस तथा सानुग्रह अनुदान इ.)
- अर्जदाराने अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही. निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर तसेच नियुक्ती झाल्यानंतरही अर्जदार विहित अर्ज/पात्रता धारण न करणारा, गैरवर्तन करताना दबाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास संबंधिताची उमेदवारी अथवा निवड रद्द करणेत येईल, तसेच काही आक्षेप आढळल्यास कोणतीही पुर्व सुचना न देता त्याची नियुक्ती समाप्त करणेत येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- वर नमूद केलेल्या तीन पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2025 आहे. हे अर्ज तुम्हाला जुना ड प्रभाग कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील, मनपा प्राथमिक शाळा, पिंपरीगाव येथे जमा करायचे आहेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.
2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : विहित अर्जाचा नमुना भरून वर दिलेल्या समक्ष जमा करायचा आहे.
3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा 28 हजार रुपये पर्यंत पगार मिळेल.
5.अर्ज शुल्क किती आहे?
Ans : अर्जाच्या शुल्काची माहिती जाहिरातीमध्ये दिलेली नाही.