Close Visit MahaNews12

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! | MSRTC Bharti 2025

MSRTC Bharti 2025 : एसटी महामंडळामध्ये नोकरीची संधी मिळविण्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी हि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यामध्ये विविध पदांच्या काही रिक्त जागांसाठी हि भरती आयोजित करण्यात आली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

या भरती करीत ऑफलाईन अर्ज सादर करायचे असून त्याची लिंक व इतर माहिती खाली नमूद केलेली आहे. वाशीम व अकोला जिल्ह्यामध्ये हि भरती राहणार आहे त्याकरिता तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून अर्ज सादर करू शकणार आहेत.

पदांचा तपशील :

समुपदेशक

एकूण रिक्त जागा : 02

शैक्षणिक अर्हता व इतर निकष

मान्यताप्राप्त विद्यापीठाची / संस्थेची समाजकार्य याविषयांकीत पदव्युत्तर पदवी [M.S.W] किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची / संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवी [ M.A. PSYCHOLOGY] अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदवीका [ ADVANCE DIPLOMA IN PSYCHOLOGY]

समुपदेशन क्षेत्रातील शासकीय / निम शासकीय / मोठ्या खाजगी संस्थामधील किमान २ वर्षांचा अनुभव.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

इतर अटी व शर्ती

रा.प. महामंडळाच्या विभागामध्ये आवश्यकतेनुसार समुपदेशकांची मानद तत्वावर नेमणूक करण्यात येईल व त्याकरीता मासिक मानधन रू.४०००/- देण्यांत येईल. प्रथम १ वर्षांसाठी सदर पदी मानद तत्वावर नेमणुक देण्यांत येईल. सदर काळात केलेल्या कामाचा आढावा घेउन पुढे सदर नेमणुक चालू ठेवायची किंवा नाही हे ठरविण्यांत येईल.

अर्ज करण्याची पद्धती

वरील अर्हता प्राप्त करणाऱ्या उमेदवारांचे फुलस्केप पेपरवर अर्ज टंकलिखीत करून स्वतःचा फोटो त्यावर चिकटवावा व अर्जासोबत शाळा सोडल्याबाबतचा दाखला शेक्षणिक अर्हतेबाबत प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला जोडावा. सदर अर्ज आपण विभाग नियंत्रक रा.प. अकोला यांचेकडे दिनांक २०.१०.२०२५ पर्यंत पोहोचतील या बेताने पाठवावा. याबाबत अधिक माहितीसाठी विभाग नियंत्रक यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कं. मध्ये लिपिक पदांसाठी नवीन भरती सुरु! | Mahatransco Bharti 2025

कर्तव्य

रा.प. महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये समुपदेशनाव्दारे मानसिक ताणतणावाचे निवारण करणे, त्यांच्याशी वैयक्तीक संवाद साधून अडीअडचणी समजाऊन घेऊन वैयक्तीक पातळीवर निराकरण करणे व आवश्यकता वाटल्यास वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवून पुढील उपचाराची गरज निदर्शनास आणून देणे तसेच आगारास महिन्यातून किमान ३ वेळा भेटी देणे.

नेमणुकीचा कालावधी

सदर नेमणुक निव्वळ मानद तत्वावर असून नेमणुकीचा कालावधी एक वर्ष राहील. आवश्यकता वाटल्यास समुपदेशकाचा कार्यकाल विचारात घेऊन नेमणूकीचा कालावधी विभागामार्फत वाढविण्यात येईल. सदर नियुक्ती मानद तत्वावर असल्याने रा.प. महामंडळाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे/सामावून घेण्याचे वा नियमीत सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचे अधिकार / हक्क अर्जदारास/समुपदेशकास नसतील. तसेच सक्षम प्राधिकारी/नियुक्ती प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत समुपदेशकाची सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील.

PDF जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

 

FAQ

1.ही भरती कोणासाठी आहे?
ही भरती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात समुपदेशक पदासाठी आहे. वाशीम व अकोला जिल्ह्यांसाठी ही भरती असून, कोणत्याही जिल्ह्यातील पात्र उमेदवार अर्ज करू शकतात

2.अनुभवाची गरज आहे का?
होय. समुपदेशन क्षेत्रातील शासकीय/निमशासकीय/मोठ्या खाजगी संस्थेमध्ये किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे .

3.मानधन किती मिळेल?
नेमणूक मानद तत्वावर प्रथम 1 वर्षासाठी राहील. कामाचा आढावा घेऊन कालावधी वाढवता येईल

1 thought on “महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! | MSRTC Bharti 2025”

Leave a Comment