Sassoon Hospital Pune Bharti 2025 : महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्य विभाग मुंबई अंतर्गत ससून रुग्णालय पुणे यांच्या आस्थापनेवरील गट “ड” (वर्ग-4) संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता 354 जागांसाठीमेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची एक चांगली संधी असणार आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत,तुम्ही पात्रता पूर्ण करत असाल तर आजच अर्ज करा आणि पुणे येथील सरकारी नोकरीच्या संधीचा लाभ मिळवा.
पदसंख्या
- एकूण – 354 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता
जाहिरातीमधील नमूद पदांसाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिध्दी दिनांकाच्या रोजी उमेदवाराने पुढीलप्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.
अ) महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील दि.०६ जून, २०१७ च्या अधिसुचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासनमान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परिक्षा [१० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (सर्व पदांकरीता सामाईक अर्हता.)
आ) नाभिक या पदाकरीता उपरोक्त (अ) मधील शैक्षणिह अर्हते सह औद्योगिक प्रशिक्षण केंद्राकडील (I.T.I.) केश कर्तनालय प्रमाणपत्र अभ्याक्रम पुर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
इ) सहाय्यक स्वयंपाकी या पदाकरीता उपरोक्त (अ) मधील शैक्षणिह अर्हते सह कमीत कमी एक वर्षाचे नोंदणीकृत व्यवसायधारकाचे स्वयंपाक करता असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
ई) प्रयोगशाळा परिचर/क्षकिरणसेवक / प्रयोगशाळा सेवक पदासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी.) शास्त्र (विज्ञान) विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
उ) माळी या पदाकरीता माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी, व कृषी शाळेचा माळी (फलोत्पादन) हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
ऊ) क्ष किरण सेवक या पदाकरीता माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी) असावा.
ऋ) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
पगार
- यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कमीत कमी 15000 व जास्तीत जास्त 47600 रुपये पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.
अर्ज पद्धती
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
वयोमर्यादा
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे असणे गरजेचे आहे.
अर्ज शुल्क
- खुला प्रवर्ग -1000 रुपये
- मागास प्रवर्ग – 900 रुपये
नोकरीचे ठिकाण
- ससून रुग्णालय,पुणे आहे.
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
- 15 ऑगस्ट 2025
पदांचा तपशील
- गॅस प्लँट ऑपरेटर – 01
- भांडार सेवक – 01
- प्रयोगशाळा परिसर – 01
- दवाखाना सेवक – 04
- संदेशवाहक – 02
- बटलर – 04
- माळी – 03
- प्रयोगशाळा सेवक – 8
- स्वयंपाकी सेवक – 08
- नाभिक – 08
- सहाय्यक स्वयंपाकी – 09
- हमाल – 13
- रुग्णपटवाहक – 10
- क्ष किरण सेवक – 15
- शिपाई – 02
- पहारेकरी – 23
- चतुर्थ श्रेणी सेवक – 36
- आया – 38
- कक्षसेवक – 168
- एकूण – 354 रिक्त जागा
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचे फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली असावी.
- मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी चालू स्थितीत असावा.
- दहावीचे प्रमाणपत्र ओळखपत्र(आधार कार्ड पॅन कार्ड इत्यादी)
- जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागू असल्यास
- महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात सविस्तर वाचायची आहे.
- उमेदवारांना उमेदवार दहावी पास असणे आवश्यक आहे तसेच उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असावे.
- उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास
- वेळेला उमेदवाराचे उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- माहितीसाठी उमेदवारांनी उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ भेट द्यावी उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःच सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे अर्धवट असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1. ही भरती कोणत्या विभागात आहे?
उत्तर :ही भरती महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्य विभाग, मुंबई अंतर्गत ससून रुग्णालय, पुणे येथे गट “ड” (वर्ग-4) संवर्गातील पदांसाठी आहे.
2. एकूण किती रिक्त जागा आहेत?
उत्तर : एकूण 354 रिक्त जागांसाठी ही मेगा भरती आहे
3. पगार किती मिळेल?
उत्तर : पदानुसार ₹15,000 ते ₹47,600 पर्यंत पगार मिळू शकतो
4. अर्ज कसा करायचा?
उत्तर : अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे
5. नोकरीचे ठिकाण कोणते आहे?
उत्तर : ससून रुग्णालय, पुणे