Close Visit MahaNews12

SBI : ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची संधी;स्टेट बँकेमध्ये 6589 जागांसाठी मेगा भरती,पगार…

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये ज्युनिअर असोसिएट पदासाठी मेगा भरती जाहीर झाल्या असून तरुण उमेदवारांना सरकारी बँकेमध्ये नोकरीची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे, जे उमेदवार बँकेमध्ये करिअर करायची असेल त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी असणार आहे. SBI Bharti 2025

6000 पेक्षा अधिक जागांसाठी संपूर्ण भारतभरामध्ये हे पदभरती जाहीर करण्यात आली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत याच्या परीक्षा सप्टेंबर 2025 च्या आसपास घेण्यात येणार आहे. SBI Recruitment 2025

पदांचा तपशील

ज्युनिअर असोसिएट (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) – 6589 जागा.

शैक्षणिक पात्रता व इतर निकष

हे पदभरती संपूर्ण भारतभरामध्ये राबवण्यात येणार असून यासाठी उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर झालेल असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी ही पदवी 31 डिसेंबर 2025 च्या अगोदर पूर्ण केलेली असावी.

जे उमेदवार शेवटच्या वर्षाला शिकत असतील असे उमेदवार सुद्धा या पदभरती मध्ये अर्ज करू शकतात परंतु त्यांचे पदवीचे शिक्षण 31 डिसेंबर 2025 अगोदर होणे आवश्यक राहणार आहे. उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2025 रोजी किमान 20 वर्षे व कमाल 28 वर्षे असणे आवश्यक आहे.

या पदभरती मध्ये राखीव प्रवर्गासाठी वयामध्ये शिथिलता ठेवण्यात आली असून उमेदवाराने अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात आणि त्यातील वयोमर्यादा वाचावी आणि त्यानंतर अर्ज सादर करावा. या व्यतिरिक्त दिव्यांग उमेदवार साठी काही जागा राखीव आहेत तसेच वेगवेगळ्या प्रकारची शिथिलता त्यांना देण्यात आलेली आहे त्याची सुद्धा माहिती घेऊन अर्ज सादर करावा.

निवड प्रक्रिया

या पदभरती मध्ये निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षेद्वारे होणार आहे, सर्वप्रथम पूर्व परीक्षा ही शंभर मार्काची घेतल्या जाईल, त्यानंतर मूळ परीक्षा 200 मार्कची असेल.

आणि त्यानंतर स्थानिक भाषेच्या ज्ञानाविषयी एक चाचणी घेतली जाईल व त्या सर्वांमध्ये मिळालेल्या गुणांनुसार उमेदवारांची निवड केली जाते. जी मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे ती मेरिट लिस्ट राज्यानुसार असेल याची दक्षता घ्यावी.

मासिक वेतन (State Bank Of India Bharti 2025)

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या पदावरती मध्ये निवड झालेल्या उमेदवाराला किमान 24,050 व कमाल 64,480 रुपये एवढी मासिक वेतन दिल्या जाणार आहे. यासोबतच विविध शहरानुसार उमेदवाराला वेगवेगळे भत्ते सुद्धा दिल्या जातात. दरवर्षी होणाऱ्या पगार वाढीमध्ये या उमेदवाराला फायदा मिळणार आहे.

अर्जाचे शुल्क

उमेदवाराला अर्जाचे शुल्क म्हणून ऑनलाईन पद्धतीने फी भरायची आहे यामध्ये अनुसूचित जाती/जमाती व दिव्यांग उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारलेले नाही इतर उमेदवारासाठी 750 रुपये एवढे शुल्क आकारले गेले आहे.

अर्ज कसा करावा

उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे अर्ज सादर करणेची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. अर्ज सादर करण्याचा कालावधी हा 06 ऑगस्ट 2025 पासून 26 ऑगस्ट 2025 पर्यंत राहणार आहे उमेदवारांनी त्या दरम्यानच आपल्या ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत आणि अर्जाचे शुल्क सुद्धा ऑनलाईनच भरायचे आहे.

उमेदवारासाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांना अर्ज सादर करते वेळेस अलीकडच्या काळातील पासपोर्ट फोटो स्कॅन करून अपलोड करावा इतर कागदपत्रे जाहिरातीमध्ये दिलेला गाईडलाईनुसारच अपलोड करावेत.
  • उमेदवाराला हाताने लिहिलेले एक डिक्लेरेशन द्यायचे आहे डिक्लेरेशन जाहिरातीमधील पण नंबर 7 वर उपलब्ध आहे ते हाताने कोऱ्या कागदावर लिहून अपलोड करायचे आहे.
  • अर्ज व्यवस्थित रित्या व्यवस्थित वाचून पूर्ण भरायचा आहे एकदा अर्ज भरल्यानंतर हा अर्ज तुम्ही डिलीट करू शकणार नाहीत किंवा त्या अर्जामध्ये कोणत्याही बदल करू शकणार नाही याची नोंद घ्यावी.
  • ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर आणि नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तसेच अर्ज शुल्क भरल्यानंतर अर्जंट ची प्रिंट काढून तुम्हाला स्वतः जवळ ठेवायची आहे त्याचे प्रिंट स्टेट बँक ऑफ इंडिया कडे पाठवण्याची आवश्यकता राहणार नाही.
  • अर्ज करण्या अगोदर आपण पात्रता धारण करत आहोत की नाही हे तुम्हाला पाहायचे आहे आणि त्यानंतरच अर्ज सादर करायचा आहे.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
FAQ (Frequently Asked Question)

1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती केंद्र सरकारमार्फत संपूर्ण भारतभर राबविण्यात येणार आहे.

2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑनलाईन अर्ज सादर करावा, वर लिंक दिलेली आहे.

3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा 64,480 रुपये पर्यंत पगार मिळेल.

4.निवड कशी होईल?
Ans : परीक्षाद्वारे निवड केली जाईल.

5.अर्ज शुल्क किती आहे?
Ans : अनुसूचित जाती/जमाती व दिव्यांग उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारलेले नाही इतर उमेदवारासाठी 750 रुपये एवढे शुल्क आकारले गेले आहे.

1 thought on “SBI : ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची संधी;स्टेट बँकेमध्ये 6589 जागांसाठी मेगा भरती,पगार…”

Leave a Comment