सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत 82 जागांसाठी मोठ्ठी भरती सुरु | SMKMC Bharti 2025

SMKMC Bharti 2025 : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमार्फत 82 रिक्त जागांसाठी विविध पदांवर भरती ची जाहिरात निघालेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. तरुणांना नोकरीची चांगली संधी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिके मध्ये उपलब्ध झाली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खाली दिलेली संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी व पात्रता धारण करत असल्यास अर्ज सादर करावा. ही भरती प्रक्रिया ऑफलाइन होणार असल्याने उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज डाउनलोड करून आवश्यक ते त्या सर्व कागदपात्रासहित अर्ज सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  1. वैद्यकीय अधिकारी – 26 जागा
  2. पब्लिक हेल्थ मॅनेजर – 02 जागा
  3. शहर गुणवत्ता आश्वासक समन्व्यक – 01 जागा
  4. कार्यक्रम सहायक – 01 जागा
  5. स्टाफ नर्स – 24 जागा
  6. आरोग्य सेविका – 02 जागा
  7. बहुउदेशशीय कामगार – 02 जागा
  8. फार्मासिस्ट – 02 जागा
  9. लॅब टेक्निशियन – 02 जागा
  10. क्स-रे टेक्निशियन – 01 जागा

शैक्षणिक पात्रता

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळी असल्याने उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी कमीत कमी पात्रता हि १२वी पस असणार आहे.

निवडीचे निकष (SMKMC Bharti 2025)

शासन मार्गदर्शक सुचनेनुसार गुणांकन केल्यावर गुणानुक्रमानुसार अधिक तम गुण मिळालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. सदर यादीबाबत आक्षेप असल्यास ते सादर करण्याकरिता २ दिवसाची मुदत देण्यात येईल व आक्षेपसोबत त्याच्या पुष्ठीर्थ योग्य पुरावे सादर करणेस सुचित करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका

मासिक वेतन (Sangli Miraj Kupwad Municipal Corporation)

याभरती मध्ये उमेदवाराला दरमहा 15000 ते 75000 रुपये पगार देण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत व कालावधी

उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या मुळ प्रती व छायांकित केलेल्या साक्षांकित प्रतीसह उपरोक्त नमुद केलेल्या रिक्त पदांसाठी अर्ज स्विकारण्याची मुदत दि. १२/०९/२०२५ पासून ते दि. ०३/१०/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजेपासुन ते ०५.०० वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) स्विकारण्यात येतील. तसेच दिनांकः ०३/१०/२०२५ नंतर उमेदवारांच्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. ई-मेलव्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अर्ज पाठविण्याचा पत्ता

वैदयकीय आरोग्य अधिकारी, आरसीएच कार्यालय, पाण्याच्या टाकीखाली, आपटा, पोलिस चौकी शेजारी, उत्तर शिवाजी नगर, सांगली- ४१६४१६

सर्वसाधारण अटी व सूचना
  • जाहिरातीतील पदांच्या संख्येत बदल होवु शकतो. त्या-त्या वेळेच्या रिक्त पदांच्या संख्येनुसार भरती करण्यात येईल.
  • निवड यादीतील गुणानुक्रमांकाचे आधारे प्राधान्य क्रमाने पदस्थापना दिली जाईल. त्याबाबत उमेदवारांनी कोणत्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.
  • उपरोक्त पदांकरीता निवड प्रक्रिया हि प्राप्त अर्जाच्या संख्येनुसार छाननी करून गुणानुक्रमे यादी तयार करण्यात येवून गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. निवड समितीचा निर्णय अंतीम राहील.
  • गुणांकन यादी तयार केलेनंतर दोन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवारांना समान गुण असल्यास ज्या उमेदवाराचे वय जास्त आहे अशा उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. तसेच उमेदवारांचे गुणांकन व वय देखील समान असले तर अशा वेळी उमेदवाराचा संबधित पदाशी निगडीत अनुभव जास्त असेल अशा उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
  • उमेदवारांने एकापेक्षा जास्त पदाकरीता अर्ज सादर करायचा असल्यास, प्रत्येक पदाकरीता स्वतंत्रपणे अर्ज व स्वतंत्र धनाकर्ष सादर करावा. परंतु वेळप्रसंगी एकाच वेळी मुलाखत/परीक्षा घेतली गेल्यास कोणत्या तरी एका पदाकरीता उपस्थित रहावे लागेल. ज्यास उपस्थित राहील, त्या पदाकरीता संबंधित उमेदवार ग्राहय धरुन, दसऱ्या पदाकरीता गैरहजर ग्राहय धरण्यात येईल.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

FAQ (Frequently Asked Question)

1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.

2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : विहित अर्जाचा नमुना भरून वर दिलेल्या पत्त्यावर सादर करायचा आहे.

3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा नियमानुसार पगार मिळेल.

4.निवड कशी होईल?
Ans : परीक्षा व मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

Leave a Comment