SRPF Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलच्या रिक्त जागांसाठी ऑगस्टमध्ये शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला होता आणि डिसेंबर अखेर ही भरती राबवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार होते 29 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्रातील जवळपास विविध विभागात भरतीच्या जाहिराती प्रकाशित झाले असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुद्धा मागवण्यात येत आहे.
ऑनलाइन अर्ज त्याची पात्रता व इतर सविस्तर माहिती आणि जिल्ह्यानुसार रिक्त पदांचा तपशील खाली दिलेला आहे तसेच खाली लिंक वरून जिल्ह्यानुसार जाहिराती सुद्धा दिलेल्या असून इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि व्यवस्थित जाहिराती वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
प्रसिद्ध जाहिरातीनुसार पदसंख्या
- राज्य राखीव पोलीस बल – 1133 जागा
अर्ज करण्याचा कालावधी
ऑनलाईन अर्ज दिनांक 29 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाल्या असून 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहे तसेच ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2025 हि राहणार आहे.
अर्जाचे शुल्क/परीक्षा शुल्क
वर नमूद केलेल्या सर्व पदांसाठी अर्जाचे शुल्क खुल्या प्रवर्गाला 450 रुपये तर मागास प्रवर्गासाठी 350 रुपये एवढे राहिले.
आवश्यक कागदपत्रे (SRPF Bharti 2025)
- दहावी/बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- जन्मदाखला
- अधिवास प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- जात वैधता प्रमाणपत्र
- संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
- नॉन-क्रिमीलेयर व इतर आवश्यक प्रमाणपत्र सोबत जोडावेत
वयोमर्यादा (SRPF Recruitment 2025)
उमेदवाराचे किमान वय 18 वर्षांपूर्वी तसेच कमालवे 28 वर्षात खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 33 प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी 45 वर्ष ठेवण्यात आली आहे इतर सविस्तर माहिती तुम्ही सूचना च्या लिंक वरून पाहू शकता.
बॉम्बे हायकोर्टामध्ये विविध रिक्त जागांसाठी बंपर भरती सुरु;ऑनलाईन अर्ज करा
शैक्षणिक अर्हता
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांची उच्च माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक मधून पदवी धारण केलेले उमेदवार सुद्धा यासाठी अर्ज सादर करू शकतात तसेच ज्या उमेदवाराने इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा झालेला आहे असे उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात.
शारीरिक पात्रता
उंची : महिला उमेदवारासाठी उंची 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी पुरुष उमेदवार करिता 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी.
छाती : पुरूष उमेदवाराकरिता न फुगवता 79 cm पेक्षा कमी नसावे व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक 5 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावा.
इतर महत्त्वाच्या सूचनासाठी खाली सूचनाचे परिपत्रक दिलेला आहे ते डाऊनलोड करावे तसेच रिक्त जागा व जाहिराती पहाव्यात.
| अ.क्र. | विभाग/जिल्हा | राज्य राखीव पोलीस बल (SRPF) | एकूण रिक्त जागा |
| 1 | नागपूर | 52 | 52 |
| 2 | चंद्रपूर | 200 | 200 |
| 3 | दौंड | 269 | 269 |
| 4 | पुणे | 193 | 193 |
| 5 | कोल्हापूर | 31 | 31 |
| 6 | जळगाव | 291 | 291 |
| 7 | यवतमाळ | 11 | 11 |
| 8 | अहिल्यानगर | 86 | 86 |
| 9 | गडचिरोली | 202 | 202 |
| 10 | गोंदिया | 194 | 194 |
| एकूण रिक्त जागा | 1133 | 1133 | |
| सूचना पत्रक | इथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | इथे क्लीक करा |
| विभागानुसार जाहिराती | इथे क्लीक करा |
FAQ
1.भरती प्रक्रिया कधी सुरू झाली?
29 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले.
2.अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती?
30 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे.
3.एकूण किती पदांची भरती होणार आहे?
सध्या 1133 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
4.अर्ज कसा करायचा आहे?
अधिकृत पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.
5.अर्ज शुल्क किती आहे?
खुल्या प्रवर्गासाठी ₹450, मागास प्रवर्गासाठी ₹350.
6.शैक्षणिक पात्रता काय आहे?
बारावी उत्तीर्ण, डिप्लोमा किंवा मुक्त विद्यापीठ पदवी
