Thane Mahanagarpalika Bharti : ठाणे महानगरपालिकेत नोकरी करणाऱ्या शोधणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी !! ठाणे महानगरपालिकेत नेहमीच नोकरीच्या जाहिराती येत असतात त्याचप्रमाणे स्टाफ नर्स (जीएनएम-पुरुष, महिला) या पदाकरिता ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रतेनुसार आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर दिनांक 18 डिसेंबर 2025 पर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- स्टाफ नर्स (जीएनएम – पुरुष, महिला).
नोकरीचे ठिकाण
- या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण ठाणे असणार आहे.
पगार Thane Municipal Corporation
- यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार हा 20000 पर्यंत दिला जाणार आहे.
वयोमर्यादा
- किमान वयोमर्यादा 18 वर्षे अराखीव प्रवर्ग करीता, कमाल वयोमर्यादा 38 वर्ष व राखीव प्रवर्गाकरीता 43 वर्ष राहील.
अर्ज शुल्क
- खुल्या प्रवर्गासाठी 750 रुपये, तर राखीव प्रवर्गासाठी 500 रुपये करण्यात आलेले आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 18 डिसेंबर 2025.
पदसंख्या
- एकूण – 05 जागा
अर्ज सादर करण्याचा पत्ता
- चौथा मजला, सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका इमारत, सर सेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखडी, ठाणे (पश्चिम) ४००६०२
अर्ज पद्धती
- उमेदवाराने अर्ज ऑफलाईन पद्धतीने (टपालाने / कुरीयरने) सादर करायचे आहे.
अधिकृत संकेतस्थळ : https://thanecity.gov.in/
शैक्षणिक पात्रता Thane Mahanagarpalika Bharti
- उमेदवाराचे शिक्षण बीएससी नर्सिंग झालेले असणे गरजेचे आहे. (सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी)
आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड/ओळखपत्र, फोटो आणि सहीचा फोटो
नोकरीचे ठिकाण
- ठाणे, महाराष्ट्र
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करावेत.
- अर्ज आवश्यक सर्व कागदपत्रांसह जाहिराती दिलेल्या अर्जाच्या नमुन्यातच सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
- अर्ज सादर करत असताना उमेदवारांनी शैक्षणिक अनुभव, जात दाखले, प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडायचे आहेत.
- अपूर्ण माहिती भरलेले व आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- अर्जामध्ये उमेदवाराने स्वतःचा वैध ई-मेल आयडी तसेच चालू असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे बंधनकारक राहील.
- उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी आहे हे नमूद करणे आवश्यक आहे, उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- सदर भरती प्रक्रियेत आवश्यकतेनुसार बदल करण्याचे व सदर भरती प्रक्रिया पूर्णतः किंवा अंशतः रद्द करण्याचे अधिकार माननीय आयुक्त ठाणे महानगरपालिका ठाणे यांनी राखून ठेवलेले आहेत.
- सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी तसेच अधिकृत संकेतस्थळावर देखील सर्व माहिती उपलब्ध आहे.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1.ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?
ही भरती स्टाफ नर्स (जीएनएम – पुरुष, महिला) पदांसाठी आहे.
2.शेवटची तारीख काय आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 डिसेंबर2025
3.अर्ज कसा करायचा आहे?
ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे
4.वेतन किती मिळेल?
20,000 पर्यंत मासिक वेतन मिळू शकते
5.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
ठाणे, महाराष्ट्र

1 thought on “ठाणे महानगरपालिकेत 12वी पासवर निघाली नवीन भरती त्वरित अर्ज करा | Thane Mahanagarpalika Bharti”