Thane Mahanagarpalika Jobs : ठाणे शहरातील सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी! ठाणे महानगरपालिकेने गट “क” आणि गट “ड” मधील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख फक्त 2 दिवसावर आलेली आहे तरी उमेदवाराने सर्व जाहिरातीचा तपशील वाचून लवकरात लवकर अर्ज सादर करावेत हि विनंती.
📌 भरतीचे तपशील
- एकूण पदे: 1773
- गट “क” – 1620 पदे
- गट “ड” – 153 पदे
- नोकरीचे ठिकाण: ठाणे, महाराष्ट्र
- पगार: ₹15,000 ते ₹1,32,300 (पदानुसार फरक)
🎓 शैक्षणिक पात्रता
पदानुसार पात्रता वेगळी आहे – 10वी, 12वी, पदवी, इंजिनिअरिंग, GNM, B.Sc, DMLT, MSc, B.Pharm इत्यादी पात्रता आवश्यक असू शकते. मूळ जाहिरात वाचणे अत्यावश्यक आहे.
📅 महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू: 12 ऑगस्ट 2025
- अर्ज शेवटची तारीख: 2 सप्टेंबर 2025
💻 अर्ज पद्धत (Thane Mahanagarpalika Jobs)
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
- अधिकृत संकेतस्थळ: thanecity.gov.in
💰 अर्ज शुल्क
- सामान्य (Open) – ₹1000
- मागासवर्गीय – ₹900
- माजी सैनिक/दिव्यांग – शुल्क नाही
👉 एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करत असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज व शुल्क भरावे लागेल.
📑 आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- जातीचा दाखला (लागू असल्यास)
- आधार कार्ड / ओळखपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- सही असलेला फोटो
- चालू ई-मेल व मोबाईल क्रमांक
⚠️ उमेदवारांसाठी सूचना
- अर्ज करण्याआधी मूळ जाहिरात वाचून पात्रता व अटी तपासाव्यात.
- चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते.
- अर्ज फक्त ऑनलाईन स्वीकारले जातील – इतर पद्धतीने आलेले अर्ज नाकारले जातील.
- भरतीसंबंधी अंतिम निर्णय ठाणे महानगरपालिकेकडे राखून ठेवण्यात आलेला आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1.ही भरती कोणासाठी आहे?
ही भरती गट “क” आणि गट “ड” मधील विविध पदांसाठी आहे. यामध्ये लिपिक, कनिष्ठ अभियंता, परिचारिका, अग्निशामक, सहाय्यक परवाना निरीक्षक इत्यादी पदांचा समावेश आहे.
2.अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
2 सप्टेंबर 2025 ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे.
3.शैक्षणिक पात्रता काय आहे?
पदाच्या प्रकारानुसार पात्रता वेगवेगळी आहे – 10वी, 12वी, पदवी, इंजिनिअरिंग, GNM, DMLT, B.Pharm, MSc इत्यादी.
4.वयोमर्यादा काय आहे?
02 सप्टेंबर 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असावे. मागासवर्गीय, अनाथ व इतर पात्र गटांना 5 वर्षांची सूट आहे.
5.पगार किती मिळेल?
पदाच्या स्वरूपानुसार पगार ₹15,000 ते ₹1,32,300 पर्यंत असू शकतो.