ZP Bharti 2025 : जिल्हा परिषदेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी ! जिल्हा परिषद रायगड अंतर्गत शासनाच्या योजना तसेच जिल्हा परिषद मार्फत असलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या योजनांच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांना प्रसिद्ध देण्यासाठी तसेच जनता व जिल्हा परिषद यांच्यात समन्वय साधण्यासाठी मानधनि तत्त्वावर काही रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारानी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्ष अथवा पोस्टाने सादर करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता व पगार
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे गरजेचे आहे
- या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हा परिषदेने ठरवून दिलेल्या मासिक मेहनताना रक्कम रुपये 20 हजार प्रमाणे देण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
- अर्ज स्वीकारण्याची कालमर्यादा : उमेदवारांनी अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 30 सप्टेंबर 2025 ते 13 ऑक्टोबर 2025, पर्यंत सार्वजनिक सुट्टी सोडून कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत दुपारी 03:00 वाजेपर्यंत प्रत्येक अथवा पोस्टाने सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ZP Bharti 2025)
- सामान्य प्रशासन विभाग, रायगड जिल्हा परिषद, कुंटेबाग, प्रशासकीय इमारत, अलिबाग, जिल्हा रायगड, पिन कोड – 402201.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या अटी व शर्ती
- जिल्हा परिषदेने ठरवून दिलेल्या नियुक्त उमेदवारास अदा केले जाणारी मासिका रक्कम ही कंत्राटी 11 महिन्यांसाठी असल्याने नियुक्त अर्जदाराला नियमित जिल्हा परिषद कर्मचारी म्हणून संबोधले जाणार नाही.
- अर्जदाराला कोणत्याही प्रकारे आणि कोणत्याही वेळेस शासकीय सेवेत कायम करण्याबाबत दावा करता येणार नाही तसेच कोणत्याही क्षणी त्याची नियुक्ती संपुष्टात आणण्याचा किंवा मुदतवाढ देण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेला आहे.
- अर्जदाराने अर्ज करण्याच्या सर्वसाधारण कार्यपद्धती द्वारे विविध मुदतीत आढळत सादर करायचे आहेत तसेच
- उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रति जोडाव्यात, विहित मुदतीत प्राप्त आणि शैक्षणिक अर्हता प्राप्त अशा पात्र उमेदवारांच्या अर्जाचा विचार मुलाखतीसाठी ग्राह्य धरण्यात येईल.
- मुलाखतीचा दिनांक, वेळ आणि ठिकाण याबाबतचा तपशील उमेदवारास पत्रांनी कळविला जाईल.
- अपवादात्मक परिस्थितीमध्ये सदरची जाहिरात कारण न देता रद्द करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहे
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल आयडी, दूरध्वनी क्रमांक व घराचा पत्ता अचूक नमूद करायचा आहे.
विशेष सूचना
- अर्ज अपूर्ण असल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज अपात्र ठरवला जाईल.
- कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव किंवा शिफारस केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्जाच्या लिफाफ्यावर स्पष्टपणे पदाचे नाव नमूद करणे आवश्यक आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
FAQ
1️⃣ ही भरती कुठे केली जात आहे?
👉ही भरती जिल्हा परिषद, रायगड येथे केली जात आहे.
2️⃣ भरती कोणत्या कालावधीसाठी आहे?
👉ही भरती ११ महिन्यांच्या कंत्राटी स्वरूपात मानधन तत्वावर केली जात आहे.
3️⃣ अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
👉अर्ज 30 सप्टेंबर 2025 ते 13 ऑक्टोबर 2025, पर्यंत सार्वजनिक सुट्टी सोडून कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत दुपारी 03:00 वाजेपर्यंत
4️⃣ अर्ज कुठे पाठवायचा आहे?
👉अर्ज सामान्य प्रशासन विभाग, रायगड जिल्हा परिषद, कुंटेबाग, प्रशासकीय इमारत, अलिबाग, जिल्हा रायगड, पिन कोड – 402201.
5️⃣ काय ऑनलाइन अर्ज सादर करता येतो?
👉सध्या जाहिरातीनुसार ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध नाही. अर्ज फक्त प्रत्यक्ष किंवा पोस्टाने स्वीकारले जात आहेत.