ZP DEO Bharti 2025 : जिल्हा परिषदेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी !! शिक्षण विभाग सातारा जिल्हा परिषद सातारा अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाची काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.उमेदवारांनी अर्ज जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात सादर करायचा आहे.
पदांचा तपशील
- डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator)
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण किमान मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून बारावी पास असणे आवश्यक आहे.
- पदवीधर उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल तसेच उमेदवाराला मराठी टंकलेखन 30 शब्द प्रतिमिनिट, इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट स्पीड असणे आवश्यक.
- एम एस सी आय टी (MSCIT) किंवा समक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
हे हि वाचा 👉👉 बांधकाम कामगारांना 5000 रुपये दिवाळी बोनस मिळणार; पात्रता कागदपत्रे अर्ज प्रक्रिया येथे पहा Bandhkam Kamgar Diwali Bonus 👈👈
पगार
- यामध्ये उमेदवारांना मासिक मानधन हे 25000 रुपये देण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख
- इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने दिनांक 23 सप्टेंबर 2025 पूर्वी जाहिराती मधील विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
हे हि वाचा 👉👉 PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे 2000 रूपये बँक खात्यावर जमा! 👈👈
उमेदवारांसाठी सूचना
उमेदवारांनी विहीत नमुन्यात अलीकडच्या काळातील साक्षांकित पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज सादर करावा, सदर अर्जाच्या पाकिटांवर डाटा एन्ट्री ऑपरेटर (प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना) पदाकरीता अर्ज असे नमुद करावे.
- अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, वय, अनुभव इत्यादी संदर्भातील कागदपत्रांच्या छायांकित साक्षांकित प्रती जोडाव्यात.
- अर्ज दिनांक 23/09/2025 पर्यंत सकाळी 10.30 ते सायं. 06.00 या वेळेत, समक्ष अथवा पोष्टाने, सुट्टीचे दिवस वगळून स्विकारले जातील. त्यानंतर आलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्विकारले जाणार नाहीत.
- पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द झालेनंतर त्या उमेदवारांनी www.zpsatara.gov.in या संकेतस्थळावरून परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करून त्यावर उमेदवाराचा अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवून व साक्षांकित करून प्रवेश पत्रावर नमूद असलेल्या परिक्षेच्या ठिकाणी नमूद वेळेच्या अगोदर उपस्थित रहावे. सविस्तर सूचना प्रवेश पत्रावर देण्यात येतील.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
FAQ
प्रश्न 1: या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असावा, पदवीधर उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. मराठी टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रति मिनिट वेग आवश्यक आहे. MSCIT किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
प्रश्न 2: या पदासाठी किती पगार मिळेल?
उत्तर: मासिक मानधन ₹२५,००० रुपये निश्चित करण्यात आले आहे.
प्रश्न 3: अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: अर्ज विहित नमुन्यात भरून ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्जासोबत साक्षांकित पासपोर्ट साईज फोटो आणि आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित छायांकित प्रती जोडाव्यात.
प्रश्न 4: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २३ सप्टेंबर २०२५ असून सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.०० या वेळेत अर्ज समक्ष किंवा पोस्टाने स्वीकारले जातील. सुट्टीचे दिवस वगळून.
प्रश्न 5: अर्जाच्या पाकिटावर काय नमूद करायचे आहे?
उत्तर: “डाटा एन्ट्री ऑपरेटर (प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना) पदाकरीता अर्ज” असे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे.
I am interested