Close Visit MahaNews12

नाशिक महानगरपालिकेत 114 जागांसाठी मोठी भरती जाहीर;ऑनलाईन अर्ज करा | Nashik Mahanagarpalika Bharti 2025

Nashik Mahanagarpalika Bharti 2025 :नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी, प्रस्तुत जाहिरातीत नमुद केलेप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही अभियांत्रिकी सेवेमधील आहेत. सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरीता जाहिरात देण्यात येत आहे. सदर जाहिरातीनूसार गट ‘क’ मधील एकूण 114 पदांकरीता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक १०/११/२०२५ पासून ते दिनांक ०१/१२/२०२५ रोजी पर्यंत आहे इच्छुक उमेदवारांनी www.nmc.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १०/११/२०२५ पासून ते दिनांक ०१/१२/२०२५ या दिवशी रात्री ११.५५ वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावेत.

शैक्षणिक पात्रता व इतर निकष

  1. मान्यता प्राप्त विद्यापिठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका.
  2. शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्था येथे किमान ०३ वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी कामाचा अनुभव.
  3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

अर्जाचे शुल्क

  • खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु.१०००/-
  • मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु ९००/-
  • परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पध्दतीनेच भरणा करण्यात यावे.
  • उमेदवारास प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदांकरीता अर्ज करावयाचे असल्यास अशा
  • प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करुन त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
  • परीक्षा शल्क ना परतावा (Non-Refundable) आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 434 जागांसाठी मेगा भरती सुरू!! | PDCC Bank Bharti 2025

निवड प्रक्रिया

उमेदवाराची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे केल्या जाणार आहे सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे.

अर्ज करण्याचा कालावधी

10 नोव्हेंबर 2025 पासून 01 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.

पदाचे नाव व तपशील

  • सहाय्यक अभियंता (विद्युत)
  • सहाय्यक अभियंता (स्थापत्य)
  • सहाय्यक अभियंता (यांत्रिकी)
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
  • कनिष्ठ अभियंता (वाहतुक)
  • सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • सहाय्यक कनिष्ठ अभियंता (विद्युत)

मासिक वेतन (NMMC Bharti 2025)

पदानुसार मानधन देण्यात येणार असून कमीत कमी 29200 ते 132300 रुपये मासिक वेतन देण्यात येईल.

अटी व शर्ती
  1. परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी नाशिक
    महानगरपालिका www.nmc.gov.in या संकेत स्थळावर माहिती प्रसारित केली जाईल यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  2. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादी बाबतचा तपशिल व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.nmc.gov.in या संकेत स्थळावर भेट देण्यात यावी. तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशिल, वेतनश्रेणी, वयोमर्यादा / वयोमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्व साधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतूदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशिल www.nmc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
  3. सदरची परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकुण संख्येमध्ये बदल करण्याचा अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांनी राखून ठेवला आहे.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
FAQ 

1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती नाशिक महानगरपालिका राबविण्यात येणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : विहित अर्जाचा नमुना भरून वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.

3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा 29200-132300 रुपये पर्यंत पगार मिळेल.

4.निवड कशी होईल?
Ans : परीक्षा व मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

5.अर्ज शुल्क किती आहे?
Ans : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.900/- व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.1000/-

Leave a Comment