Close Visit MahaNews12

घरबसल्या आधारचा फोटो आणि मोबाईल नंबर बदला,पहा पूर्ण प्रोसेस | Aadhar update new process

Aadhar update new process : आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर, नाव अपडेट करणे व ईमेल आयडी अपडेट (Aadhar Name Update) करणे आतापर्यंत खूप अवघड जात होते. परंतु आता हे सगळं घरबसल्या आपण अपडेट करू शकणार आहोत. ते कशा पद्धतीने चेंज करायचे याच्या विषयी माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

आधार च्या पोर्टलवर आपण आतापर्यंत फक्त आपला पत्ता अपडेट करू शकत होतो परंतु 15 नोव्हेंबर पासून आपण आपला मोबाईल नंबर बदलू शकतो, पत्ता बदलू शकतो, नाव सुद्धा चेंज करू शकतो आणि ईमेल आयडी मध्ये सुद्धा बदल करू शकतो.

महिला एसटीच्या तिकीटासाठी नवीन नियम लागू एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

यासाठी तुम्हाला (New Aadhar Mobile Application) नवीन आधारचे जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन डाऊनलोड करून त्यामध्ये खालील प्रमाणे प्रोसेस करायची आहे, खाली आधारच्या अधिकृत एप्लीकेशन ची लिंक दिलेली आहे त्या लिंक वरून तुम्ही आधारचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता.

मोबाइल नंबर अपडेट करण्याची प्रक्रिया (Aadhar Mobile Number Update)

  1. आधार नवीन ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला खालील प्रक्रिया पार पाडायची आहे.
  2. सर्वप्रथम इंट्रोडक्शन स्किप करायचा आहे.
  3. त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरने ते ॲप्लिकेशन व्हेरिफाय करून घ्यायच आहे.
  4. एप्लीकेशन व्हेरिफाय झाल्यानंतर आपला आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे.
  5. आधार क्रमांक टाकल्यानंतर फेस ऑथेंटीकेशन करून घ्यायच आहे
  6. फेस ऑथेंटीकेशन झाल्यानंतर तुम्हाला QR कोड आणि तुमचा तुमच्या आधारची डिटेल्स दिसेल त्याला वर स्क्रोल करायच आहे.
  7. स्क्रोल केल्यानंतर माय आधार अपडेट हे ऑप्शन दिसेल यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट, ईमेल आयडी अपडेट व नेम अपडेट असे पर्याय दिसतील त्यामधून तुम्हाला ज्याच्यामध्ये बदल करायचे आहे ते तुम्हाला निवडायचा आहे.
  8. नवीन मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पत्ता किंवा नाव तुम्हाला टाकायचा आहे.
  9. त्यानंतर परत बायोमेट्रिक म्हणजे फेस ऑथेंटिकेट करायचा आहे
  10. फेस ऑथेंटीकेशन सक्सेस झाल्यानंतर 75 रुपये एवढे शुल्क तुम्हाला भरायचे आहे.

लाडक्या बहिणींनो आता तारीख वाढणार नाही;पटकन करा eKYC

त्यानंतर तुम्ही जे अपडेट दिलेली आहे त्याचे एक्नॉलेजमेंट तुम्हाला तिथे मिळेल आणि काही वेळातच तुमचा नंबर सुद्धा आधारला लिंक केलं जाईल जो बदल आहे तो बदल सुद्धा केला जाईल.

काही परिस्थितीमध्ये हा बदल करण्यास विलंब लागू शकतो आणि हा विलंब 30 दिवसापर्यंत असू शकतो.

अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या आपली माहिती (aadhaar email id update online) अपडेट करू शकता, तुम्हाला आधार सेंटर ला जाण्याची सुद्धा आवश्यकता पडणार नाही. हि माहिती आवडली असल्यास तुमच्या मित्रांना व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

आधार चे नवीन ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

FAQ

प्रश्न 1 : आधारमध्ये कोणते बदल घरबसल्या करता येतात?
उत्तर : मोबाईल नंबर, ईमेल आयडी, नाव आणि पत्ता अपडेट करता येतात.

प्रश्न 2 : अपडेट करण्यासाठी कोणते ॲप्लिकेशन वापरावे लागेल?
उत्तर : UIDAI चे नवीन आधार ॲप्लिकेशन डाउनलोड करून वापरावे लागेल.

प्रश्न 3 : अपडेटसाठी किती शुल्क आहे?
उत्तर : प्रत्येक अपडेटसाठी ₹75 शुल्क भरावे लागते.

प्रश्न 4 : फेस ऑथेंटीकेशन का आवश्यक आहे?
उत्तर : तुमची ओळख पडताळण्यासाठी फेस ऑथेंटीकेशन अनिवार्य आहे.

प्रश्न 5 : बदल लागू होण्यासाठी किती वेळ लागतो?
उत्तर : साधारण काही तासांत, परंतु कधी कधी 30 दिवसांपर्यंत विलंब होऊ शकतो

1 thought on “घरबसल्या आधारचा फोटो आणि मोबाईल नंबर बदला,पहा पूर्ण प्रोसेस | Aadhar update new process”

Leave a Comment