Collector Office Bharti 2025 : जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग मंत्रालय, मुंबई अधिनस्त संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज, पदमभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली, आरोग्य शिक्षण पथक, तासगांव यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील खालीलप्रमाणे विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) स्पर्धा परिक्षेसाठी दिनांक १४/०९/२०२५ पासून दिनांक ०४/१०/२०२५, २३:५९ वाजेपर्यंत या कालावधीत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
सदरची पुर्ण प्रक्रिया आय.बी.पी.एस., या कंपनीमार्फत करण्यात येणार असून अर्ज सादर करण्याबाबतचे अधिकृत संकेतस्थळा बाबतची माहिती https://www.gmcmiraj.edu.in या संकेतस्थळावर यथावकाश उपलब्ध करुन देण्यात येईल. उमेदवारास प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज करावा लागेल. उमेदवारांची शैक्षणिक अर्हता/पदांचा तपशील शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परिक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सुचना इत्यादीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
पदांचा तपशील व रिक्त जागा
शिपाई,माळी,धोबी,परिचर,सेवक स्वयंपाकी व इतर – 263 जागा (पदनिहाय रिक्त जागांसाठी मूळ जाहिरात वाचा)
शिक्षण व इतर निकष
अ) महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील दि.०६ जून, २०१७ च्या अधिसुचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासनमान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परिक्षा [१० वी ] उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (सर्व पदांकरीता सामाईक अर्हता.)
आ) न्हावी या पदाकरीता उपरोक्त (अ) मधील शैक्षणिह अर्हते सह औद्योगिक प्रशिक्षण केंद्राकडील (I.T.I.) केश कर्तनालय प्रमाणपत्र अभ्याक्रम पुर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
इ) सहाय्यक स्वयंपाकी या पदाकरीता उपरोक्त (अ) मधील शैक्षणिह अर्हते सह कमीत कमी एक वर्षाचे नोंदणीकृत व्यवसायधारकाचे स्वयंपाक करता असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
ई) प्रयोगशाळा परिचर पदासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी.) शास्त्र
(विज्ञान) विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
उ) माळी या पदाकरीता उपरोक्त (अ) मधील शैक्षणिह अहेते सह माळी प्रमाणपत्र.
ऊ) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
वयोमर्यादा : इच्छुक उमेदवारांचे वय किमान 18 वर्ष व कमाल 38 वर्ष असावे, वयाच्या शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.
परिक्षेचे स्वरुप
परिक्षा ही ऑनलाईन (Computer based Test) पध्दतीने घेण्यात येईल. परिक्षेच्या प्रश्न पत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक ०२ गुण ठेवण्यात येतील.
अर्ज करण्याची पद्धत व कालावधी
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून, हे अर्ज 14 सप्टेंबर 2025 पासून 04 ऑक्टोबर 2025 पर्यंत सादर करायचे आहेत.
उमेदवारांसाठी सूचना
- परीक्षेच्यावेळी उमेदवाराने स्वतःचे प्रवेश प्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे. त्या शिवाय, परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
- प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आल्या नंतर उमेदवाराला त्याच्या अर्जात नमुद नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे कळविण्यात येईल. या बाबतची घोषणा कार्यालयाच्या संकेतस्थळावर परीक्षे पूर्वी एक आठवडा अगोदर प्रसिध्द करण्यात येईल.
- परीक्षेच्या दिनांका पूर्वी ३ दिवस अगोदर प्रवेश प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास मे.आय.बी.पी.एस. यांचे टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
- परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसेन्स यापैकी किमान कोणतेही एक मुळ ओळखपत्र तसेच मुळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
FAQ
1.ही भरती कोणत्या विभागासाठी आहे?
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, सांगली व तासगाव आरोग्य शिक्षण पथकासाठी गट-ड पदांची भरती आहे.
2.एकूण किती पदे उपलब्ध आहेत?
263 रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
3.पदांची नावे कोणती आहेत?
शिपाई, माळी, धोबी, परिचर, सेवक, स्वयंपाकी व इतर सहाय्यक पदे.
4.शैक्षणिक पात्रता काय आहे?
सर्वसाधारणपणे 10वी उत्तीर्ण; काही पदांसाठी ITI प्रमाणपत्र किंवा अनुभव आवश्यक आहे.
5.वयोमर्यादा किती आहे?
किमान 18 वर्षे आणि कमाल 38 वर्षे; शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.