Close Visit MahaNews12

महसूल विभागात 35,876 पदांसाठी मेगा भरती, वाचा पूर्ण डिटेल्स | Mahsul Vibhag Bharti 2026

Mahsul Vibhag Bharti 2026 : राज्य सरकारने तब्बल वीस वर्षांनंतर महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी दिल्याने आता महसूल विभागात एकूण 35 हजार 876 पदे असतील.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

महसूल विभागातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने राज्यातील सहा महसूल विभागांत ११ नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये आणि ८ नवीन उपविभागीय कार्यालय, २ तहसीलदार कार्यालये, ६९ अतिरिक्त तहसीलदार कार्यालये स्थापन होणार आहेत.

नवीन कार्यालयांचे मुख्यालय आणि कार्यक्षेत्र निश्चित करण्याची प्रक्रिया आता जिल्हाधिकारी स्तरावर वेगाने पूर्ण होईल. महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंधास राज्य सरकारने अंतिम मान्यता दिली आहे.

महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून, काळानुरूप वाढलेला कामाचा व्याप आणि लोकांच्या गरजा लक्षात घेऊन हा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. यामुळे प्रशासकीय कामात अधिक सुसूत्रता येईल, नवीन कार्यालयांमुळे जनतेला कामासाठी दूर जावे लागणार नाही आणि कामकाजात मोठी गती येईल – चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री.

या निर्णयामुळे महसूल विभागाच्या रचनेत मोठे बदल होणार असून, एकूण ३५ हजार ८७६ पदांना मंजुरी दिली आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क, भूमी अभिलेख आणि महसूल विभाग या तिन्ही विभागांचा सुधारित आकृतिबंध आहे.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

20 वर्षानंतर भरती

वीस वर्षानंतर प्रथमच महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतिबंध मान्यता मिळाली आहे. याआधी, महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध 2006 मध्ये झाला होता, परंतु मागील वीस वर्षात महसूल व बिगर महसुली कामात अनेक बदल झाले.

त्यामुळे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुढाकर घेत महसूल विभागाच्या सुधारीत आकृतिबंध करण्यासाठी माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांची समिती नेमली होती.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

या समितीने केलेल्या शिफारशीनार महसूल विभागातील ३४ हजार ५७६ नियमित व १३०० बाह्रास्रोतांद्वारे असे मिळून ३५ हजार ८७६ पदांचा आकृतिबंध तयार केला होता. आणि या नवीन संरचनेत विभाग, जिल्हा तालुका पातळीवरील कार्यालयांचा समावेश आहे. यात ६ विभागीय जिल्हाधिकारी कार्यालये, १९२ महसूल उपविभागीय कार्यालये आणि ३६० तहसीलदार कार्यालयांचा समावेश आहे.

तसेच क्षेत्रीय स्तरावर २ हजार ६२५ मंडळ कार्यालये आणि १५ हजार ७४७ तलाठी सजांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. प्रशासकीय सोयीसाठी ११ नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये आणि ८ नवीन उपविभागीय कार्यालये, २ आयुक्तालये, ३६ तहसीलदार कार्यालय, ६९ अतिरिक्त तहसीलदार कार्यालये सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “महसूल विभागात 35,876 पदांसाठी मेगा भरती, वाचा पूर्ण डिटेल्स | Mahsul Vibhag Bharti 2026”

Leave a Comment