PMC Recruitment 2025 : पुणे महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागांतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑनलाईन सादर करायचे आहेत. हे अर्ज 13 ऑगस्ट 2025 पासून 30 ऑगस्ट 2025 पर्यंत करायचे आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून असून पोस्टाने किंवा कुरियरने अर्ज पाठवू नये असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. सोबत खाली दिलेल्या आवश्यक कागदपत्राचा तपशील बघावा आणि त्यानंतर पात्र असल्यास अर्ज सादर करावा.
पदांचा तपशील
कनिष्ठ अभियंता – एकूण 169 जागा
पात्रता व इतर निकष (PMC Recruitment 2025)
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ या संवर्गातील एकूण ११३ जागा सरळसेवेने भरणेसाठी दैनिक वर्तमान पत्रामध्ये व पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात क्र.१/१५७९ दि.०९/०१/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार दि. १६/०१/२०२४ ते दि. ०५/०२/२०२४ या कालावधीत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करणेची सुविधा पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती.
दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गकरीता
आवश्यक कागदपत्रे
- जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र मागासवर्गीय उमेदवारांनी
- जातीचा दाखला किंवा जात वैधता प्रमाणपत्र
- महिला विवाहित असल्यास विवाह प्रमाणपत्र जोडावे
- आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र सोबत जोडावे
- उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
अर्ज करण्याची पद्धत (PMC Bharti 2025)
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून खाली अर्जाची लिंक तसेच पीडीएफ जाहिरात दिलेली आहे, पीडीएफ जाहिरात तुम्हाला व्यवस्थित वाचून ऑनलाईन रज खालील लिंकवरून सादर करायचा आहे.
अर्ज सादर करण्याचा कालावधी (PMC)
13 ऑगस्ट 2025 पासून ऑनलाईन अर्ज घेण्यात येत असून उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरून 30 ऑगस्ट 2025 पूर्वी अर्ज सादर करावेत.
इतर महत्वाच्या सूचना
- सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा (SEBC) अथवा इतर मागासवर्गाचा (OBC) दावा करण्यासाठी विकल्प नव्याने सुधारित करून सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मुळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल.
- तसेच, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करण्यासाठी विहित पध्दतीने तसेच विहित कालावधीत विकल्प सादर न करणा-या उमेदवारांचा प्रस्तुत परीक्षेकरीता यापुर्वी अर्ज सादर करताना केलेला दावा अंतिम समजण्यात येईल व सदर दावा बदलण्याची विनंती भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही टप्प्यावर मान्य करण्यात येणार नाही.
- सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचे (SEBC) अथवा इतर मागास वर्गाचे (OBC) जात प्रमाणपत्र मिळाले आहे, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (EWS) दावा केलेल्या उमेदवारांनी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) अथवा इतर मागास वर्गाचा (OBC) विकल्प सादर न केल्यास उमेदवारांचा प्रस्तुत परीक्षेकरीता यापुर्वी अर्ज सादर करताना केलेला दावा अंतिम समजण्यात येईल व सदर दावा बदलण्याची विनंती भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही टप्प्यावर मान्य करण्यात येणार नाही.
- जाहिरात क्र. १/१५७९ दि.०९/०१/२०२४ नुसार इतर मागासवर्ग (OBC) या प्रवर्गात भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणासाठी जागा उपलब्ध नव्हती. आता सुधारित पदसंख्येनुसार इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गासाठी एक जागा भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणासाठी उपलब्ध झाल्याने ज्या उमेदवारांनी इतर मागासवर्ग (OBC) या प्रवर्गातून अर्ज सादर केलेला आहे व त्यांच्याकडे भूकंपग्रस्त प्रमाणपत्र आहे असे उमेदवार आपला समांतर आरक्षणासाठीचा दावा सुधारित करू शकतात.
PDF जाहिरात | जाहीर प्रकटन | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न – PMC भरती 2025
1. PMC भरती 2025 साठी अर्ज कधी करायचा आहे?
उत्तर: अर्ज 13 ऑगस्ट 2025 पासून सुरू होतील आणि 30 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
2. अर्ज कशा पद्धतीने सादर करायचा?
उत्तर: अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने PMC च्या अधिकृत संकेतस्थळावरून सादर करायचा आहे. पोस्टाने किंवा कुरियरने पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. कोणत्या पदासाठी भरती आहे?
उत्तर: कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ पदासाठी एकूण 169 जागा उपलब्ध आहेत.
4. अर्जासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?
उत्तर: संबंधित स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील पात्रता आवश्यक आहे. अधिक तपशील जाहिरात क्र. १/१५७९ दि. ०९/०१/२०२४ मध्ये दिले आहेत
5. भूकंपग्रस्त समांतर आरक्षणासाठी कोण पात्र आहे?
उत्तर: इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गातील उमेदवार ज्यांच्याकडे भूकंपग्रस्त प्रमाणपत्र आहे, ते सुधारित पदसंख्येनुसार समांतर आरक्षणासाठी दावा करू शकतात.