Maha Metro Recruitment 2025 : महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नागपूर व पुणे मेट्रोसाठी विविध पदावर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज 30 ऑक्टोबर 2025 संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
खाली संपूर्ण पात्रता व जाहिरातीची लिंक दिलेली आहे यासोबतच अर्जाच्या नमुन्याची लिंक सुद्धा दिलेली आहे, इच्छुक तसेच पात्रता धारक उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व त्यानंतर ऑफलाईन पद्धतीने खालील लिंक वरून अर्ज सादर करावा.
पदांचा तपशील
सिनियर ऑफिस असिस्टंट – 02 जागा
नोकरीचे ठिकाण
हि पदभरती नागपूर,व पुणे या ठिकाणांसाठी ठेवण्यात अली आहे.
अर्ज करण्याची पद्धत व कालावधी
इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने 30 ऑक्टोबर 2025 संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत सादर करावेत.
शैक्षणिक पात्रता
जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे सिनियर ऑफिस असिस्टंट पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून MBA HR असणे आवश्यक आहे. पदवी धारण केलेली असावी.
पगार (Maha Metro Recruitment 2025)
निवड झालेल्या उमेदवाराला 33 हजार एवढे वेतन दरमहा दिले जाणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
General Manager (HR), Maharashtra Metro Rail Corporation Ltd.,Metro Bhawan, Near Dikshabhoomi, NAGPUR – 440 010.
निवड प्रक्रिया
प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून गुणाच्या टक्केवारीनुसार मिरीट लिस्ट काढल्या जाईल त्यानंतर उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल आणि मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड केल्या जाईल.
उमेदवारांसाठी सूचना
- अर्जाचा लिफाफा योग्यरित्या सीलबंद केलेला असावा आणि त्यावर पदाचे नाव आणि जाहिरात क्रमांक लिहिलेला असावा.
- ज्या उमेदवारांची निवड झाली आहे आणि ज्यांचे अर्ज मुलाखतीसाठी पात्र मानले गेले आहेत त्यांनाच अर्जात दिलेल्या ईमेलद्वारे मुलाखतीला उपस्थित राहण्यास सूचित केले जाईल, ते प्रत्यक्ष किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे.
- मुलाखतीसाठी आवश्यक सूचना (व्यक्तीगत किंवा कुलगुरूंद्वारे) योग्य वेळी निवडलेल्या उमेदवारांना कळवल्या जातील. उमेदवारांना वैयक्तिकरित्या पोस्टाने कोणताही वेगळा संपर्क पाठवला जाणार नाही. अद्ययावत माहितीसाठी उमेदवारांनी MAHA-Metro च्या वेबसाइट वर सतत संपर्कात राहावे.
- निवड प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना नोंदणीकृत ई-मेल आयडीद्वारे कळवले जाईल.
- निवडलेल्या उमेदवारांना महामेट्रो वेबसाइटवर नमूद केलेल्या वैद्यकीय मानकांनुसार वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले जाईल.
- या जाहिरातीअंतर्गत भरतीच्या अटी आणि शर्तींमध्ये आवश्यक आणि लागू असल्यास त्यानंतरचे कोणतेही बदल / सुधारणा / भर घालण्याचा अधिकार महा मेट्रो राखून ठेवते.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
FAQ
1. ही भरती कोणत्या शहरांसाठी आहे?
उत्तर: ही भरती नागपूर, पुणे मेट्रो प्रकल्पांसाठी आहे.
2. कोणत्या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे?
उत्तर: व्यवस्थापकीय पदांसाठी एकूण 02 जागा उपलब्ध आहेत.
3. अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
उत्तर: अर्ज 30 ऑक्टोबर 2025 संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने सादर करावा लागेल.
4. शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची MBA HR पदवी/पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
5. मुलाखतीसाठी सूचना कशी मिळेल?
उत्तर: पात्र उमेदवारांना नोंदणीकृत ईमेल आयडीवर सूचना दिली जाईल. पोस्टाद्वारे कोणताही वेगळा संपर्क केला जाणार नाही.
