Close Visit MahaNews12

वनविभागात विविध पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरु! पगार, पात्रता.. | Vanvibhag Bharti 2025

Vanvibhag Bharti 2025 : वनविभागामध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी ! वन विभागाअंतर्गत काही रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारानी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने ईमेलवर किंवा ऑफलाइन पद्धतीने खालील पत्त्यावर सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

आवश्यक पात्रता

  • अर्जदार पर्यावरण विज्ञान / वनीकरण / वनस्पतीशास्त्र किंवा संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर धारक असावा.
  • अर्जदार पर्यावरण शास्त्र या शाखेचा पदव्युत्तरधारक असल्यास प्राधान्य दिले जाईल.
  • पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था किंवा समुदाय आधारित कार्यक्रमांमध्ये कामाचा अनुभवअसल्यास प्राधान्य दिले जाईल. सोबत अनुभवाचे प्रमाणपत्र सादर करावे.
  • वने, पर्यावरणीय कायदे आणि नियमांचे ज्ञान यांचेबाबत माहिती असावी.
  • उत्कृष्ट संभाषण कौशल्य तसेच इंग्रजी, मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असावे.
  • संगणक हाताळण्याचे कौशल्य असावे (MS Office, ई-मेल संवाद व मुलभूत डिजिटल साधनांमध्ये प्राविण्य).

अर्ज करण्याची अंतिम तारीख

उमेदवारांनी अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा इमेलवर दिनांक 29 ऑक्टोबर 2025 पूर्वी पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व इमेल आयडी

प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय, मध्यवर्ती इमारत, पुणे ४११००१’ या पत्त्यावर दि. २९/१०/२०२५, वेळ १७.०० वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत किंवा तत्पूर्वी पोस्टाव्दारे / प्रत्यक्ष हजर राहून किंवा pccfsfd@mahaforest.gov.in/pccfsfm@gmail.com या ई-मेल आयडीवर सादर करु शकतात.

पदांचे नाव : योजना समन्वयक

नोकरीचे ठिकाण

पुणे, महाराष्ट्र

महत्वाच्या सूचना
  1. कोणतेही कारण न देता नेमणूक नाकारण्याचा पूर्ण अधिकार निवड समितीकडे राहिल त्याबाबत अन्य यंत्रणांकडे दाद मागता येणार नाही.
  2. सदर पदाचे मुख्यालय ‘प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे’ कार्यालय असेल.
  3. प्रस्तुत योजनेच्या केलेल्या कामांबाबत पाक्षिक अहवाल (१५ दिवस) दैनंदिनी स्वरुपात नियंत्रण अधिकारी यांना सादर करणे बंधनकारक राहील.
  4. दैनंदिनीचे अवलोकन करुन मासिक अनुज्ञेय मानधन अदा करण्यात येईल.
  5. साप्ताहिक ०२ सुट्ट्या वगळता, इतर कोणत्याही शासकीय सुट्ट्या अनुज्ञेय राहणार नाहीत. या व्यतिरिक्त अनुपस्थितीचा कालावधी हा विना मानधन म्हणून ग्राह्य धरण्यात येईल व उपस्थितीच्या कालावधीचे मानधन अदा करण्यात येईल.
    अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थित राहवयाचे असल्यास संबंधीतांस मुख्यालय सोडतांना नियंत्रण अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील.
  6. विना परवाना सलग १० दिवस अनुपस्थित असणे ही बाब संबंधित पदावरचा हक्क गमावणारी असेल.
  7. एखाद्या अर्जदाऱ्याच्या बाबतीत निकष शिथिल करण्याचा अधिकार निवड समिती अध्यक्षांचा राहील.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

FAQ

1.ही भरती कोणासाठी आहे?
वनविभागात नोकरी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

2.किती पदांसाठी भरती आहे?
01 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध.

3.शैक्षणिक पात्रता काय आहे?
जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे

4.पगार किती मिळेल?
नियमानुसार मानधन देण्यात येईल आपली अपेक्षा अर्जामध्ये नमूद करावी.

5.अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
29 ऑक्टोबर 2025 पूर्वी अर्ज पाठवावा.

6.अर्ज पाठविण्याची पद्धत कोणती?
ईमेल किंवा ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर

Leave a Comment