GMC Bharti 2026 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात “डेटा एंट्री ऑपरेटर” पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात दिलेल्या तारखेस सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- डेटा एंट्री ऑपरेटर
पदसंख्या GMC Recruitment 2026
- एकूण तीन रिक्त जागा
अर्ज पद्धती
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावेत.
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक .
- मराठी टायपिंग प्रति मिनिट शब्द 30.
- इंग्रजी टायपिंग प्रति मिनिट शब्द 40.
- एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
पगार GMC Bharti 2026
- उमेदवारांना पगार 10000 रुपये दर महा दिला जाईल
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जिल्हा सामान्य रुग्णालय आवार, जळगाव. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 10:00 ते सायंकाळी 05:00 पर्यंत कार्यालयीन वेळेत द्विपत्रीत सादर करावा.)
अर्ज करण्याची तारीख
- 18 मार्च 2026 ते 30 मार्च 2026
मुलाखतीची तारीख
- उमेदवारांनी मुलाखतीसाठी 07 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता दिलेले पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.
मुलाखतीचा पत्ता
- 07 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता आपल्या सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव यांच्या दालनात उपस्थित राहायचे आहे.
उमेदवारांसाठी महत्वाची सूचना (अटी व शर्ती )
- दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्जाची छाननी 02 एप्रिल या दिवशी करण्यात येईल व 06 एप्रिल रोजी सायंकाळी 05 :00 वाजता मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी संस्थेच्या संकेतस्थळावर तसेच नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल.
- पात्र ठरलेल्या उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस 07 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता आपल्या सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव यांच्या दालनात उपस्थित राहायचे आहे.
- उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी कोणताही राजकीय दबाव आणल्यास अशा उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
- मुलाखतीस उपस्थित राहताना उमेदवारांना स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे कार्यालयामार्फत कोणताही प्रवास भत्ता अथवा दैनंदिन भत्ता दिला जाणार नाही.
- पदभरतीचे संपूर्ण अधिकार, पदसंख्या कमी जास्त करणे, नमूद अटी शर्तीमध्ये बदल करणे इत्यादी अधिष्ठता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव यांनी राखून ठेवलेले आहेत.
- उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यातच सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
FAQ
1.ही भरती कोणासाठी आहे?
डेटा एंट्री ऑपरेटर” पदासाठी आहे.
2.किती पदांसाठी भरती आहे?
03 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध.
3.शैक्षणिक पात्रता काय आहे?
जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे
4.पगार किती मिळेल?
उमेदवारांना पगार 10000 रुपये दर महा दिला जाईल
5.अर्ज पाठविण्याची पद्धत कोणती?
ऑफलाइन,मुलाखतीद्वारे भरती होणार आहे.
