Close Visit MahaNews12

महापारेषण मध्ये 10 वी पासवर 26 जागांसाठी सरकारी नोकरीची संधी!! | Mahatransco Bharti 2026

Mahatransco Bharti 2026 : महाराष्ट्र राज्य विद्युतपारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत सरकारी नोकरीची संधी !! वीजतंत्री पदाच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील

  • वीजतंत्री

पदसंख्या Mahapareshan Bharti 2026

  • एकूण – 26 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता
  • वीजतंत्री: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शालांत परिक्षा किवां तत्सम परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औधोगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या स्वतंत्र व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय अऊदा संवसु विभाग, म.रा.वि.पा.क.मर्या. “विद्युत भवन” दुसरा मजला, आर्णी रोड, यवतमाळ ४४५००१ या पत्यावर दि. १८.०८.२०२६ पर्यंत पोस्टाने स्वहस्ते कार्यालयीन वेळेत पोहचेल या बेताने पाठविणे अनिवार्य आहे. व दि. १८.०८.२०२६ नंतर पोस्टाने स्वहस्ते प्राप्त होणा-या अर्जाचा भरती प्रक्रिये करीता विचार केला जाणार नाही तसेच सदर अर्ज भरती प्रक्रियेतुन बाद केल्या जातील याची नोंद घ्यावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 12 ऑगस्ट 2026

वयोमर्यादा 

  • किमान 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. 18 ते 30 वर्ष व मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष शिथील राहील.
निवड पद्धती Mahatransco Yavatmal Recruitment 2026
  • उमेदवाराची निवड ही मेरीट लिस्ट नुसार होणार आहे.
नोकरीचे ठिकाण
  • यवतमाळ

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना

  • प्रशिक्षणार्थी उमेदवारांची भरती ही केंद्र शासनाच्या (Apprenticeship) आरक्षणविषयक धोरणानुसार करण्यांत येईल.
  • ऑनलाइन अर्ज करताना एसीएससी गुणपत्रिका व प्रमाणपत्र, आयटीआय वीजतंत्री परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका व आयटीआय उत्तीर्ण प्रमाणपत्र जात, प्रमाणपत्र मागास प्रमाणपत्र (मागास प्रवर्गातून अर्ज केल्यास) उमेदवारांना आवश्यक रहिवासी प्रमाणपत्र, उमेदवाराची सही, फोटो, जन्मतारीख, जात प्रवर्ग, आधार कार्ड.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये आवश्यक ती सर्व माहिती अचूक नमूद करायची आहे.
  • अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी नमूद सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित व छायांकित प्रति ऑनलाईन अर्जसह मूळ कागदपत्रे पडताळणी करिता स्वतः दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.
  • ही प्रक्रियेमध्ये आवश्यकता भासल्यास कोणताही बदल करण्याची किंवा संपूर्ण जाहिरात रद्द करण्याची तसेच पदे कमी जास्त करण्याचे भरती प्रक्रियेशी निगडित असलेले सर्व अधिकार व्यवस्थापन टाकून ठेवीत आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही.
  • भरती प्रक्रियेत अवश्यकता भासल्यास कोणताही बदल करण्याचे किंवा संपूर्ण जाहिरात रद्द करण्याचे सर्व अधिकार निम्नस्वाक्षरीकारांस राहतील व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही.
  • प्रशिक्षण संपल्यानंतर शिकाऊ उमेदवारांना कंपनीच्या सेवेत सामावुन घेणे बंधनकारक नाही याची नोंद घ्यावी.
  • जाहिरात बदल किंवा जाहिरातीच्या काही भागात अंशतः बदल किंवा संपुर्ण जाहीरात रद्द करण्याचे अधिकार हे कंपनी राखून ठेवित आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही.
  • शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी कोणत्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1: ही भरती कोणासाठी आहे?
उत्तर: महाराष्ट्र राज्य विद्युतपारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत वीजतंत्री पदांसाठी भरती आहे.

प्रश्न 2: एकूण किती जागा उपलब्ध आहेत?
उत्तर: एकूण 26 जागा

प्रश्न 3: शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी/12वी + ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

प्रश्न 4: वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: किमान 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षे; शासकीय नियमानुसार सूट लागू.

प्रश्न 5: अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2 thoughts on “महापारेषण मध्ये 10 वी पासवर 26 जागांसाठी सरकारी नोकरीची संधी!! | Mahatransco Bharti 2026”

Leave a Comment