BMC Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
तरुणांना नोकरीची चांगली संधी मुंबई महानगरपालिके मध्ये उपलब्ध झाली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खाली दिलेली संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी व पात्रता धारण करत असल्यास अर्ज सादर करावा. ही भरती प्रक्रिया ऑफलाइन होणार असल्याने उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
पदाचा तपशील
- ई.सी.जी. टेक्निशियन (ई.सी.जी. तंत्रज्ञ)
- स्टाफ नर्स (परिचारिका)
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळी असल्याने उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी उमेदवार कमीत कमी 12 वी पास असणे आवश्यक आहे.
हे हि वाचा : 👉👉नवी मुंबई महानगरपालिकेत 12वी उत्तीर्णांसाठी 44 जागांवर नवीन भरती सुरु | NMMC Bharti 2025👈👈
वयोमर्यादा
- यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्ष असणे गरजेचे आहे.
नोकरीचे ठिकाण
- मुंबई
मासिक वेतन (Brihanmumbai Municipal Corporation)
- यामध्ये उमेदवाराला कमीत कमी 18000 ते जास्तीत जास्त 30000 रुपये वेतन देण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत व कालावधी
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत, ही भरती प्रक्रिया ऑफलाइन होणार असल्याने उमेदवारांनी अर्ज १५ नोंव्हेबर पर्यंत. आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह नमूद केलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
अर्ज शुल्क
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला 933 (जीएसटी सह) रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे.
हे हि वाचा : 👉👉नवी मुंबई महानगरपालिकेत 12वी उत्तीर्णांसाठी 44 जागांवर नवीन भरती सुरु | NMMC Bharti 2025👈👈
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- प्रमुख वैद्यकीय अधिकारी (प्र), पंडित मदन मोहन मालविय शताब्दी रुग्णालय, वामन तुकाराम मार्ग, गोवंडी
(प), मुंबई- ४०००८८
सर्वसाधारण अटी व सूचना
- रुग्णालयाच्या आस्थापनेवर असलेल्या रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार आणि आवश्यकतेनुसार कंत्राटी उमेदवारांची नेमणूक करण्यात येईल. तथापी कंत्राटी उमेदवारांना महापालिकेतील नोकरीवर हक्क सांगता येणार नाही.
- जाहिरातीमध्ये दिलेली पदांची संख्या आवश्यकतेनुसार कमी करण्यात येईल.
- अर्ज स्वहस्ताक्षरात, सर्व दृष्टीने पूर्ण असावेत. अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
- अलिकडच्या काळात काढलेले पारपत्र आकारातील उमेदवाराचे छायाचित्र त्याच्या स्वाक्षरीसह अर्जावर नमूद केलेल्या ठिकाणी चिकटवावे. त्याच छायाचित्राच्या दोन अतिरिक्त प्रती पुढील निवड प्रक्रियेसाठी उमेदवाराने जवळ बाळगाव्यात.
- उमेदवारांनी स्वतः निश्चित करावयाचे आहे की ते आवेदित पदांच्या सर्व अर्हता व अटी पूर्ण करतात. उमेदवार विहित अर्हता व अटी पूर्ण करीत नसल्याचे कोणत्याही क्षणी निदर्शनास आल्यास त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल. नेमणूक झाली असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता कंत्राटी तत्वावरील नियुक्ती रद्द करण्यात येईल.
- पत्रव्यवहाराचा पत्ता सुस्पष्ट व पूर्ण असावा.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
FAQ (Frequently Asked Question)
1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.
2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : विहित अर्जाचा नमुना भरून वर दिलेल्या पत्त्यावर सादर करायचा आहे.
3.पगार किती मिळेल?
Ans : कमीत कमी 18000 ते जास्तीत जास्त 30000 रुपये वेतन देण्यात येईल.
4.निवड कशी होईल?
Ans : मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
