Birth Certificate Online : जन्म नोंदणीचा दाखला असा काढा ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरून; फक्त..

Birth Certificate Online : जन्म नोंदणीचा दाखला हा शाळेपासून ते नोकरीपर्यंत लागणार अत्यावश्यक असं कागदपत्र आहे हे दाखला जर तुमच्याकडे नसेल तर काही वेळा तुमचं महत्त्वाचं काम सुद्धा थांबू शकत, त्यामुळे या दाखल्याला सर्व स्तरावर महत्त्व दिले जाते.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

नोकरीच्या ठिकाणी सुद्धा तुमच्या वयाचा पुरावा म्हणून जन्म तारखेचा दाखला अत्यावश्यक असतो हा दाखला जर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही ग्रामपंचायत मध्ये, महानगरपालिकेमध्ये किंवा जवळच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जाऊन हा दाखला घेता.

हा दाखला तुम्ही ऑनलाईन सुद्धा काढू शकता त्याची प्रोसेस आपण इथे पाहणार आहोत हे दाखला काढण्याची एकदम सोपी पद्धत आहे तिथे जाऊन तुम्ही नोंदणी करून तुमचा दाखला सहजरित्या काढू शकणार आहात आणि शासनाच्या संकेतस्थळावरून हा दाखला मिळत असल्यामुळे कोणत्याही कामासाठी तुम्ही हा दाखला वापरू शकता.

या दाखल्यासाठी आवश्यक असे कोणते कागदपत्राची गरज नाही तुम्हाला जी माहिती विचारली जाते ती माहिती फक्त त्यामध्ये भरायची असते आणि त्यानंतर त्याची पडताळणी करून तुम्हाला जन्मतारखेचा दाखला पाच दिवसाच्या आत मिळत असतो.

अशी करा नोंदणी (Apply Birth Certificate Online)

जर तुम्हाला जन्म नोंदणीचा दाखला काढायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही संकेतस्थळावर जाऊ शकता तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी करायचे आहे.

जर या अगोदर तुम्ही https://services.india.gov.in/service/detail/apply-for-birth-certificate-maharashtra या पोर्टलवर नोंदणी केले असेल तर तुम्हाला लॉगिन करून ग्रामविकास व पंचायत राज विभागामध्ये जायचंय तिथे गेल्यानंतर उपविभागामध्ये जन्म नोंदणी दाखला येथे क्लिक करायचा आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही त्यांच्या दुसऱ्या संकेतस्थळावर जाल तिथे गेल्यानंतर तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमची ग्रामपंचायत, अर्जदाराचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक असल्यास आधार क्रमांक टाकून सबमिट करून इतर आवश्यक माहिती तुम्हाला तिथे भरायचे आहे.

त्यानंतर पाच दिवसांमध्ये सर्व पडताळणी करून तुम्हाला जन्म नोंदणीचा दाखला दिला जातो आवश्यकता भासल्यास दवाखान्यातील नोंदीचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे द्यावे लागेल, यासोबतच पालकाचे आवश्यक कागदपत्रे सुद्धा मागितले जाते ते सुद्धा तिथे सबमिट करावे लागतील.

ऑनलाईन जन्माचा दाखला काढण्यासाठी येथे क्लिक करा

Frequently asked questions (FAQ’s)

1. जन्माचा दाखला कशा मिळेल?
Ans : आता हि सुविधा ऑनलाईन झाली असून तुम्ही संबंधित पोर्टल वरून ऑनलाईन अर्ज करू शकता.

2. जन्माचा दाखला किती दिवसात मिळतो?
Ans : हा दाखला काढण्यासाठी अंदाजे 15 दिवस ते 30 दिवस लागतात.

3. या साठी कोणती कागदपत्रे लागतील?
Ans : जन्माच्या नोंदीसाठीचे कागदपत्रे तुम्ही दवाखान्यातून घेऊ शकता.

4. या दाखल्यासाठी किती खर्च येतो?
Ans : हा दाखला काढण्यासाठी किमान 50 रुपये खर्च येतो.

5. हा दाखला कुठे उपयोगी पडतो?
Ans : शासनाच्या सर्व सुविधांसाठी व शाळेसाठी आणि ओळखपत्रे काढण्यासाठी उपयोगी पडतो.

2 thoughts on “Birth Certificate Online : जन्म नोंदणीचा दाखला असा काढा ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरून; फक्त..”

Leave a Comment