Close Visit MahaNews12

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये 10 वी पासवर नोकरीची सुवर्णसंधी!! MJP Maharashtra Bharti 2025

MJP Maharashtra Bharti 2025 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया गट अ, ब आणि क संवर्गातील विविध पदे भरण्यासाठी होणार असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत पदानुसार सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ कॅडर – अंतर्गत
  • लेखापरीक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी
  • लेखा अधिकारी
  • सहाय्यक लेखा अधिकारी
  • सहाय्यक लेखापाल
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिक)
  • उच्च श्रेणीतील स्टेनोग्राफर
  • निम्न श्रेणीतील स्टेनोग्राफर
  • कनिष्ठ लिपिक/लिपिक-टंकलेखक
  • सहाय्यक स्टोअरकीपर
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

पदसंख्या (Maharashtra Jeevan Pradhikaran)

  • एकूण – 290 रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण

  • महाराष्ट्र
पगार MJP Maharashtra Bharti 2025
  • निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19900/- ते 177500/- पर्यंत पदानुसार पगार देण्यात येईल.

अर्ज शुल्क

  • खुल्या वर्गासाठी- 1000/- आणि राखीव वर्गासाठी 900/-

अर्ज करण्याची पद्धत

  • उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे, 20 नोव्हेंबर 2025 ते 19 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज सादर करू शकणार आहात.

शैक्षणिक पात्रता

  • भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
  • 20 नोव्हेंबर 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 19 डिसेंबर 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना MJP Bharti 2025

  • उमेदवारांनी अर्ज जाहिरातीत दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरच ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत, ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • सदर संकेतस्थळावर प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रिये संबंधित आवश्यक ती माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी उमेदवारांची राहिली.
  • उमेदवारांनी अर्ज करताना आवश्यक ती सर्व पात्रता पूर्ण केलेली असल्याची खात्री करूनच अर्ज सादर करावेत.
  • परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण व प्रवर्गनिहाय पदसंख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार, नियुक्ती प्राधिकारी व त्यांचे नियंत्रण अधिकारी यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
  • कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे, आरक्षणासंदर्भात सविस्तर माहिती उमेदवारांनी जाहिरातीमध्ये वाचावी.
  • पद भरती पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या शासन निर्णय /शासन शुद्धिपत्रक/शासन अधिसूचना यानुसार सदर भरती निकषांमध्ये बदल होऊ शकतो.
  • सदर भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर पूर्णतः अथवा अंशतः रद्द करण्याचे अधिकार किंवा बदल करण्याचे अधिकार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी राखून ठेवले आहेत.
  • पात्र ठरलेल्या उमेदवाराला त्याने रजिस्टर केलेल्या ई-मेल व मोबाईल क्रमांकावर एसएमएस किंवा ई-मेलद्वारे निवड सूची / प्रतीक्षा यादी व नियुक्ती बाबत कळविण्यात येईल तसेच प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर निवडसूची/प्रतीक्षा यादी/नियुक्तीची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
  • सदर पदांच्या भरती करिता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल, ऑनलाइन परीक्षेची तारीख महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जदारांनी दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • भरती संदर्भात सविस्तर माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

 

FAQ

1.अर्ज कसा करायचा आहे?
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2.अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
19 डिसेंबर 2025

3.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे.

Leave a Comment