IB Recruitment 2025 : इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये सरकारी नोकरी मिळण्याचे स्वप्न तुम्ही बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गृहमंत्रालयाने इंटेलिजन्स ब्युरो मध्ये भरती जाहीर केली आहे. 10वी पास असलेल्या तरुणांना नोकरी मिळवण्याचे ही चांगली संधी आलेली आहे. IB Bharti 2025
इंटेलिजन्स ब्युरो मध्ये काही रिक्त पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे या भरतीमध्ये 362 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवाराने https://mha.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. IB Recruitment 2025
पदाचे नाव व तपशील
- मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) {MTS(G)} – 362 जागा
मासिक वेतन (Intelligence Bureau Bharti 2025)
- यामध्ये उमेदवारांना कमीत कमी ₹18,000/- ते 56,900/- पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
नोकरीचे ठिकाण
- हि भरती केंद्र सरकारमार्फत संपूर्ण भारतभर राबविण्यात येणार आहे.
अर्ज पद्धती
- उमेदवाराने अर्ज ऑनलाईन सादर करायचे आहे.
अर्जाचे शुल्क
- ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना 650 रुपये शुल्क भरावे लागेल तर अनुसूचित जाती, जमाती व अपंग उमेदवारांना 550 रुपये एवढे शुल्क भरावे लागणार आहे.
शैक्षणिक पात्रता व इतर निकष
- या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 14 डिसेंबर 2025 रोजी कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 25 वर्षापेक्षा अधिक नसावे, राखीव प्रवर्गाला नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 14 डिसेंबर 2025
निवड प्रक्रिया
- इंटेलिजन्स ब्युरोच्या या पदभरती मध्ये निवड होण्यासाठी सर्वप्रथम उमेदवाराला टियर – वन आणि टीयर दोनच्या परीक्षेला बसावे लागले. उमेदवारला दोन्ही टप्प्यात आवश्यक असणारे गुण मिळवणे गरजेचे आहे. त्यानंतर उमेदवारांना टीयर-थ्री परीक्षा/मुलाखत/व्यक्तिमत्व चाचणीमध्ये बसावे लागेल शेवटी सर्व गुणांचा आधारावर उमेदवाराची यादी तयार करण्यात येईल आणि अंतिम यादी स्थान मिळवणाऱ्या उमेदवारांना रिक्त पदांसाठी नियुक्त केले जाईल.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवाराने अर्ज सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी तसेच अधिकृत संकेतस्थळावर देखील सर्व माहिती उपलब्ध आहे.
- उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- अर्जाच्या शुल्कव्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क किंवा आर्थिक देवाण-घेवाण करू नये किंवा कोणी नोकरी मिळवून देतो म्हणून पैसे उकळत असेल तर अश्या भूलथापांना बाली पडू नये. या भरती विषयीची अधिक माहिती https://mha.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तपासू शकता.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1.हि भरती कुठे आहे?
हि भरती केंद्र सरकारमार्फत संपूर्ण भारतभर राबविण्यात येणार आहे.
2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
ऑनलाईन अर्ज सादर करावा, वर लिंक दिलेली आहे.
3.पगार किती मिळेल?
दरमहा 56,900 रुपये पर्यंत पगार मिळेल.
4.निवड कशी होईल?
परीक्षा व मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
5.अर्ज शुल्क किती आहे?
550 रुपये अर्ज शुल्क लागू राहील.
