BMC Recruitment 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (MBBS), कंत्राटी परिचारीका (GNM) आणि कंत्राटी औषधनिर्माता (PHARMACIST) यांची नियुक्ती करण्याकरिता मा. महानगरपालिका आयुक्त यांची क्र.MGC/F/5910/दि.25.03.2025 अन्वये मंजुरी प्राप्त झाली आहे.
त्याकरीता खालील पदे कंत्राटी तत्वावर भरण्याकरीता दि.20.11.2025 सकाळी 11.00 ते दि.04.12.2025 संध्याकाळी 06.00 वाजेपर्यंत या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने गुगल फॉर्मव्दारे अर्ज मागविण्यात येत आहे. याची सविस्तर माहिती व अर्जाचा नमुना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर केवळ पंधरा दिवसांकरिता प्रदर्शित करण्यात येईल.
पदाचा तपशील
- कंत्राटी वैद्यकीय अधिकारी
- कंत्राटी परिचारिका
- कंत्राटी औषधनिर्माता
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळी असल्याने उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी येथे क्लीक करावे
हे हि वाचा : 👉👉01 डिसेंबर पासून ‘या’ दुचाकी चालकांना बसणार दंड! नवीन नियम लागू 👈👈
वयोमर्यादा
- यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय दि.20.11.2025 रोजी 43 वयापेक्षा जास्त नसावे
नोकरीचे ठिकाण
- मुंबई
मासिक वेतन (Brihanmumbai Municipal Corporation)
- यामध्ये उमेदवाराला 20000-90000 मासिक वेतन दिले जाणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत व कालावधी
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत, ही भरती प्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याने उमेदवारांनी 04 डिसेंबर 2025 पूर्वी जाहिरातीमध्ये दिलेल्या QR कोडवरून ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
अर्ज शुल्क (BMC Recruitment 2025)
- कोणतेही शुल्क नाही
हे हि वाचा : 👉👉नवी मुंबई महानगरपालिकेत 12वी उत्तीर्णांसाठी 44 जागांवर नवीन भरती सुरु 👈👈
सर्वसाधारण अटी व सूचना
- उपरोक्त अर्हताधारण करण्या-या उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने वरील बार कोड व लिंकचा वापर करुन गुगल फॉर्मद्वारे दि.20.11.2025 सकाळी 11.00 ते दि.04.12.2025 संध्याकाळी 06.00 वाजेपर्यंत अर्ज भरावयाचे आहे. तसेच आवश्यकतेप्रमाणे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (MBBS), कंत्रा टी परिचारीका (GNM) आणि कंत्राटी औषधनिर्माता (PHARMACIST) यांना अर्ज भरलेल्या ई-मेलवर कळविण्यात येईल.
- दुरध्वनी वर कोणतीही माहिती कळविली जाणार नाही. ई-मेलची खात्री करणे तसेच ई-मेल वेळोवेळी चेक करणे याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची असेल.
- कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (MBBS), कंत्राटी परिचारीका (GNM) आणि कंत्राटी औषधनिर्माता (PHARMACIST) यांना रिक्त पदानुसार व जसे जसे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि पॉलिक्लिनिक व डायग्नॉस्टिक केंद्र कार्यान्वीत करण्यात येतील त्यानुसार कागदपत्रांची पडताळणी व सापेक्ष नियुक्ती आदेश देण्यात येतील.
- ही नियुक्ती प्रथमतः 179 दिवसांची असेल जर उमेदवारांचे काम समाधानकारक असेल तर कंत्राटी तत्वावर पुनर्नियुक्ती करण्यात येईल.
- तसेच या अगोदर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि पॉलिक्लिनिक व डायग्नॉस्टिक केंद्र मध्ये काम केलेल्या उमेदवारांना अधिकचे गुण दिले जातील त्यासाठी कागदपत्रे पडताळणी करताना खालील नमूद स्वरूपात त्यांनी संबंधित विभागाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी (MOH) यांनी दिलेले अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
FAQ (Frequently Asked Question)
1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.
2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : जाहिरातीमध्ये दिलेल्या QR कोडवरून ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
3.पगार किती मिळेल?
Ans : नियमाप्रमाणे दिले जाईल.
4.निवड कशी होईल?
Ans : मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
