PCMC Bharti 2026 : पिंपरी चिंचवड शहराचा वाढता विस्तार बघता पिंपरी चिंचवड मधील कर्मचाऱ्यांवर ताण सुद्धा वाढलेला आहे आणि हा ताण लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकृतीबंध मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत सुरुवातीला या महानगरपालिकेच्या आकृतीबंध मध्ये एकूण 11513 विविध पदांना मंजुरी मिळाली होती
आता त्या पदांचे मंजुरी मध्ये सुधारणा करण्यात आलेले आहे आणि त्या पदांमध्ये वाढ सुद्धा करण्यात आलेले आहेत यासाठी शासनाकडे हा आकृतीबंध मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून मंजुरी मिळाल्यानंतर भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
नवीन आकृतीबंध आराखडा
जुन्या आकृतीबंध आराखड्यामध्ये एकूण 11513 विविध पदांना मंजुरी देण्यात आली होती परंतु या आकृतीबंधात सुधारणा करून याच्यामध्ये 5325 पदाची नवीन निर्मिती केली आहे त्यामुळे तब्बल 16838 पदांचा सुधारित आकृतीबंध आराखडा तयार करण्यात आलेला आहे.
हे शासनाने मंजुरी दिल्यानंतर ही जम्बो नोकर भरती केले जाणार आहे या पदाची भरती येत्या काही कालावधीमध्ये होऊ शकते जर या पदांना मंजुरी मिळाली तर या वर्षी भरती प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते या भरती प्रक्रियेमध्ये काही पदांची भरतीला सुरुवात झालेल्या असून काही वित्त पदांसाठी लवकरच भरती करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये 300 जागांसाठी बंपर भरती सुरु | Mahavitaran Bharti 2025
कोणत्या पदाची भरती होणार?
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 16000 पदे भरले जाणार आहेत ते 16 हजार पदांमध्ये वैद्यकीय विभागातील परिचारिका इतर पदांसाठी मुलाखती घेण्यात आलेले आहेत त्यासोबतच अभियंता पदासाठी सुद्धा मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत.
त्यानंतर आरोग्य निरक्षक अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, अग्निशमन अधिकारी, उद्यान अध्यक्ष, उद्यान निरीक्षक, सुपरवायझर, लिपिक, ॲनिमल कीपर, समाजसेवक, शिपाई इत्यादी पदासाठी ही भरती होणार आहे.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
भरती कधी पर्यंत होईल?
पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये टप्प्याटप्प्यामध्ये ही भरती होत असून यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी जाहिराती निघालेल्या असतात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्व अधिकृत जाहिराती तसेच अपडेट्स आमच्या टेलिग्राम ग्रुप व सुद्धा तुम्हाला मिळतात. त्यामुळे टेलिग्राम ग्रुपला व आमच्या संकेतस्थळाला सबस्क्राईब करून ठेवा हे सर्व पदे येत्या मे महिन्यापर्यंत भरण्याची शक्यता आहे जशी जाहिराती तसे तुम्हाला कळविण्यात येईल.
FAQ
1.एकूण किती पदांची भरती होणार?
तब्बल 16,838 पदांची भरती होणार आहे.
2.नवीन आकृतीबंधात किती पदे वाढली?
5,325 नवीन पदांची निर्मिती झाली आहे.
3.भरती कधी सुरू होणार?
शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर टप्प्याटप्प्याने भरती सुरू होईल.
4.कोणत्या विभागांसाठी पदे उपलब्ध आहेत?
आरोग्य, अभियांत्रिकी, प्रशासन व इतर विभागांसाठी पदे आहेत.
5.अधिकृत माहिती कुठे मिळेल?
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर व आमच्या टेलिग्राम च्या ग्रुपवर सुद्धा मिळतील

I am deaf