VVCMC Recruitment 2026 : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) व १५ वा वित्त आयोग व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम (NTEP) अंतर्गत खालील रिक्त पदे संवर्गनिहाय भरावयाची आहेत. हि विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने थेट मुलाखतीला जायचे आहे.
दि.02 फेब्रुवारी ते दि.06 फेब्रुवारी 2026 रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवाराने खाली दिलेली जाहिरात वाचून आवश्यक ती पात्रता धारण करत असल्यास थेट मुलाखतीला हजर रहायचे आहे.
पदांचा तपशील
- बालरोग तज्ञ – 01 जागा
- साथरोग तज्ञ – 01 जागा
- शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक – 01 जागा
- पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 10 जागा
- अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 19 जागा
- वैद्यकीय अधिकारी – 52 जागा
- स्टाफ नर्स – 18 जागा
- औषध निर्माता – 02 जागा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 03 जागा
- कार्यक्रम सहाय्यक – 01 जागा
- बहुउद्देशीय कामगार – 37 जागा
पात्रता व इतर निकष (VVCMC Recruitment 2026)
वर नमूद केलेल्या पदांसाठी जाहिरातीमध्ये नमूद केल्या प्रमाणे पात्रता व वयोमर्यादा धारण करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांचा तपशील :-
1) पासपोर्ट साईज फोटो,
II) जन्म तारखेकरिता (वयाचा दाखला/दहावीचा टीसी/जन्म प्रमाणपत्र),
III) फोटो आयडी/रहिवाशी दाखला
IV) शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र
मुलाखतीची तारीख व पत्ता (VVCMC Bharti 2026)
उमेदवाराच्या थेट मुलाखती (Walk in Interview) दि.02 फेब्रुवारी ते दि.06 फेब्रुवारी 2026 रोजीपर्यंत वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, “ए” विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.) येथे सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत घेण्यात येणार आहेत.
इतर महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करावेत.
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे इतर पद्धतीने आलेले अर्ज नाकरण्यात येतील.
- उमेदवारांनी अर्ज करताना आवश्यक सर्व कागदपत्रे सोबत जोडायचे आहेत, उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवाराकडून सदर अर्ज अर्धवट, अपूर्ण, वाचण्यायोग्य नसलेला अर्ज सादर केला असल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारला गेल्यास अथवा अपात्र ठरल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. याबाबत उमेदवारांकडून कोणत्याही स्वरुपाची तक्रार स्वीकारली जाणार नाही.
- या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या मुलाखतीच्या दिवशी उमेदवाराने स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक आहेत. मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित रहावे याची नोंद घ्यावी.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न – Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026
1.ही भरती कोणत्या संस्थेसाठी आहे?
वसई विरार शहर महानगरपालिकेत भरती आहे
2.मुलाखती कधी होणार आहेत?
दि.02 फेब्रुवारी ते दि.06 फेब्रुवारी 2026
3.कोणती पदे भरली जाणार आहेत?
वर नमूद केलेल्या विविध पदांसाठी भरती आहे
4.भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
मुलाखतीच्या दिवशी अर्ज नमुना भरून थेट उपस्थित रहायचे आहे.
5.पात्रता काय आवश्यक आहे?
जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा आवश्यक आहे.
6.कागदपत्रे कोणती जोडायची आहेत?
जन्मतारखेचा दाखला, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, विवाह प्रमाणपत्र इत्यादी.
