Jalsampada Vibhag Bharti 2026 : महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात पालखेड नाशिक अंतर्गत प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन/ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
पदसंख्या
- एकूण – 3 रिक्त जागा
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
- 02 मार्च 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 13 मार्च 2026
नोकरीचे ठिकाण
- पालखेड, नाशिक
ऑनलाइन अर्ज पाठविण्यासाठी ईमेल पत्ता
- epidnashik@rediffmail.com
ऑफलाईन अर्ज पाठविण्यासाठी पत्ता
- कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक या कार्यालयाकडे दिनांक 2.3.2026 ते 13.3.2026 (सायंकाळी 5.00 वा. पर्यंत) प्राप्त होतील, अशा बेताने पाठवावेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 13 मार्च 2026
निवड प्रक्रिया
- उमेदवाराची निवड हि मुलाखतीद्वारे होईल.
पदांचा तपशील
- उपअभियंता / स. अ. श्रे-२/ शाखा. अभि. / कनिष्ठ अभियंता
मुलाखतीचा पत्ता
- कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज जाहिरातीत दिलेले अर्जाच्या विहित नमुन्यातच सादर करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज ईमेल पद्धतीने ईमेलद्वारे अथवा प्रत्यक्ष सादर करायचे आहेत, सादर करतेवेळी अर्जाच्या पाकिटावर कनिष्ठ अभियंता या पदावर करार पद्धतीवर नेमणूक करण्याबाबत असे स्पष्ट लिहायचे आहे.
- ईमेलद्वारे अर्ज सादर करतेवेळी पीडीएफ स्वरूपात सर्व कागदपत्रांसह सादर करायचा आहे.
- जाहिरातीत दिलेल्या पदसंख्येत प्रशासकीय कारणास्तव बदल करण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता यांना राखून ठेवण्यात आलेला आहे
- अर्ज करणाऱ्या उमेदवारावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदविलेला नसावा.
- मुलाखती करिता पात्र उमेदवारांना पत्र ई-मेलद्वारे पाठविण्यात येईल व ब्रह्मणध्वनीवर लघु संदेशाद्वारे कळविण्यात येईल.
- उमेदवारांनी आपल्या वैयक्तिक माहितीत त्यांचा ईमेल पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक देणे बंधनकारक आहे तसेच मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी सूचनाफलकावर प्रसिद्ध करण्यात येईल.
- अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल,अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना वैयक्तिक ई-मेलवर कळविण्यात येईल.
- सदर नियुक्ती आवश्यक सिंचन व बांधकाम कामासाठी करण्यात येत असून त्यासाठी योग्य उमेदवार न भेटल्यास काही पदे रिक्त ठेवण्याचा अधिकार समितीचा आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
