PM Kisan 22th Installment : PM किसान योजना 2019 पासून सरकार राबवत असून दर 3 महिन्याला शेतकऱ्याच्या खात्यात हा हप्ता वितरित केला जातो. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ कालावधीतील २२ वा हप्ता शुक्रवारी (दि. १३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात आला. राज्यातील ९१ लाख १८ हजार ८३१ शेतकऱ्यांना १ हजार ८३७कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले.
यापूर्वी राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना २१ हप्त्यांमध्ये ३९ हजार ३०० कोटींचा लाभ थेट खात्यात जमा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुवाहाटी येथे शेतकऱ्यांना लाभवितरणाचा कार्यक्रम झाला.
अकाउंटला पैसे जमा झाले कि नाही चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
2019 ला योजनेची सुरुवात
केंद्र शेतकऱ्यांना फेब्रुवारी २०१९ पासून ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या PM Kisan Sanman Nidhi Yojana निकषांनुसार पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) २ हजार रुपये प्रतिहप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात दरवर्षी ६ हजार रुपये त्यांच्या आधार संलग्न बैंक खात्यात जमा होतात. राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत २१ हप्त्यांमध्ये ३९ हजार ३०० कोटींचा लाभ जमा झाला आहे.
22 वा हप्ता वितरित
८३१ शेतकरी कुटुंबांना १ हजार ८३७ कोटी रुपयांचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बैंक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा झाला आहे. योजनेच्या लाभासाठी केंद्राने लाभार्थ्याने भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे, आधार संलग्न, ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे.
हफ्ता आला का नाही असा चेक करा
22 वा हप्ता शुक्रवारी वितरित झाला असून सर्व पात्र शेतकऱ्यांनी खालील लिंकवरून आपल्या खात्यात पैसे जमा झाले कि नाही चेक करू शकता.
