PMPML Bharti 2026 : पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) मध्ये एकूण १५ हजार ५१९ मंजूर पदे आहेत. त्यापैकी ७ हजार ४६८ पदे भरलेली असून, ८ हजार ५१ पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर पीएमपीकडे एकूण १ हजार ९५४ बसेस आहेत.
त्यात ६५८ स्वमालकीच्या, ७६१ भाडेतत्त्वावरील सीएनजी आणि ५३५ भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे. त्यापैकी प्रत्यक्ष संचलनात सध्या फक्त १ हजार ८०० बस आहेत. उर्वरित बस दुरुस्ती, देखभाल यासह कारणांमुळे रस्त्यावर नाहीत.
पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील प्रश्नोत्तरात पीएमपीएमएलच्या विविध मुद्दयावर भाजपचे नगरसेवक सुनील पांडे, रवींद्र साळेगावकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हर्षवर्धन मानकर, उध्दवसेनेचे गटनेते नितीन गावडे यांनी प्रश्न विचारले होते. त्याला पीएमपीएमएल प्रशासनाने लेखी उत्तर दिले.
जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लीक करा
पीएमपीएमएलमध्ये मे २०२५ च्या कर्मचारी तक्त्यानुसार पीएमपीएमएलमध्ये एकूण १५ हजार ५१९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ७ हजार ४६८ पदे भरलेली असून, ८ हजार ०५१ पदे रिक्त आहेत.
प्रशासन विभागात १ हजार ७९५ पैकी १ हजार १३५ पदे रिक्त आहेत. वर्कशॉप विभागात २ हजार ९०२ पैकी २ हजार १३३ पदे रिक्त असून, ७६९ पदे कार्यरत आहेत. वाहतूक विभागात १० हजार ८२२ पैकी ४ हजार ७८३ पदे रिक्त आहेत.
बॉम्बे उच्च न्यायालयात फक्त 7वी पासवर सफाई कामगार, शिपाई पदांसाठी मोठी भरती सुरु
असून, ६ हजार ३९ पदे भरलेली आहेत. पीएमपीएमएलच्या ताफ्यात ५३५ इलेक्ट्रिक बसेस आहेत. पीएम ई-ड्राईव्ह योजनेअंतर्गत १००० इलेक्ट्रिक बसेस खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. यात ९ मीटर नॉन एसी २०० नग, १२ मीटर बीआरटी नॉन एसी ८०० नग ई-बसेसचा समावेश आहे. डिसेंबर २०२७ पर्यंत टप्प्याटप्याने बसेस ताफ्यात दाखल होणार आहेत.
प्रवाशांना दर्जेदार, सुरक्षित सेवा देण्यासाठी आयटीएमएस प्रणालीद्वारे बस संचलनाचे सनियंत्रण, आधुनिक बस थांबे उभारणी आणि लवकरच १ हजार ७०० नवीन सीएनजी बस दाखल करण्याचे नियोजन सुरू आहे.
वर्षभरात ३९ हजार तक्रारी (PMPML Bharti 2026)
महामंडळाकडे १ जून २०२५ ते ३१ मे २०२६ या कालावधीत नागरिकांच्या ३९ हजार ४१६ तक्रारी प्राप्त झाल्या असून, सर्व तक्रारींचे निराकरण केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. दिवाळी सण होऊन ७ महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपयांचे दिवाळी बक्षीस मिळाले आहे.
