Mumbai Court Bharti 2025 : लघुवाद न्यायालय मुंबई येथे 4 थी,7वी,10वी पासवर विविध पदांसाठी बंपर भरती
लघुवाद न्यायालय मुंबई येथे 4थी,7वी,10वी पासवर ग्रंथपाल पहारेकरी माळी पदांसाठी मेगा भरती, लघुवाद न्यायालय मुंबई यांच्या स्थापनेवरील काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी अर्ज जाहिराती दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत. या भरती प्रक्रियेसाठी चौथी, सातवी, दहावी पास उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत, उमेदवारांनी अर्ज पदांनुसार पात्रतेचे निकष पूर्ण करत असल्यासच सादर करावेत
पदांचा तपशील व पात्रता
- ग्रंथपाल – 03
- पहारेकरी – 06
- माळी – 03
ग्रंथपाल – या पदासाठी उमेदवाराचे कमीत-कमी एस.एस.सी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असावा, परंतु कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेच्या पदवीधारकांन, कायद्याच्या पदवीधरकास प्राधान्य दिले जाईल.
पहारेकरी – या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी सातवी उत्तीर्ण असावे, उमेदवाराला मराठी भाषा अवगत असावी, सुदृढ शरीरि आणि पदाच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक आहे.
माळी – या पदाकरिता उमेदवार कमीत कमी चौथी उत्तीर्ण असावा, उमेदवार शारीरिक दृष्ट्या सक्षम सुदृढ आणि निर्व्यसनी असावा उमेदवारास मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क
- या कार्यालयाने भरती प्रक्रिया करिता कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारलेले नसून ती पूर्णपणे निशुल्क आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तसेच अर्जासोबत कोणत्याही प्रकारचे शुल्क जसे की दर्शनी, धनाकर्ष इत्यादी जोडू नये.
पदसंख्या Small Cause Court Mumbai Bharti
- एकूण – 12 रिक्त जागा
पगार/वेतनश्रेणी
- ग्रंथपाल : वेतर स्तर (एस-७) २१७००-६९१००/- व नियमानसार इतर देय भत्ते,
- पहारेकरी,माळी: वेतर स्तर (एस-१) १५००० – ४७६००/- व नियमानुसार इतर देय भत्ते.
अर्ज करण्याची पद्धत
- ऑफलाईन- नोंदणीकृत पोच डाकेने म्हणजेच (RPAD) किंवा शीघ्र डाकसेवेन (Speed Post).
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 25 सप्टेंबर 2025
पत्ता
- प्रबंधक, लघुवाद न्यायालय, लोकमान्य टिळक मार्ग, धोबी तलाव, मुंबई -400002
नोकरीचे ठिकाण
- मुंबई.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- ज्या पदासाठी उमेदवारांनी अर्ज केला आहे त्या पदाचा उल्लेख बंद लिफाफ्यावर ठळक अक्षरात करून अर्ज प्रबंधक, लघुवाद न्यायालय, लोकमान्य टिळक मार्ग, धोबी तलाव, मुंबई – 400002 यांच्याकडे पाठवावेत.
- अर्जासोबत कोणतीही मूळ कागदपत्रे जोडू नयेत, उमेदवारांना मूळ कागदपत्रे सादर करण्याबाबत योग्य वेळी सूचना दिली जाईल.
- या कार्यालयाने भरती प्रक्रिया करिता कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नसून ती पूर्णपणे निशुल्क आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तसेच अर्जासोबत कोणत्याही प्रकारचे शुल्क जसे की दर्शनी, धनाकर्ष इत्यादी जोडू नये.
- उमेदवारांनी अर्जासोबत स्वतःच्या नावासह संपूर्ण पत्ता असलेला लिफाफा पाच रुपयाच तिकीट लावून पाठवावा.
- अपूर्ण अर्ज किंवा असा अर्ज उमेदवाराने सादर केलेल्या तपशिलामुळे त्यास पदासाठी अपात्र ठरवेल तो अर्ज बाद ठरविला जाईल.
- जे उमेदवार मुलाखतीकरिता पात्र ठरतील त्यांना मुलाखतीकरिता बोलावले जाईल उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, बोर्ड सर्टिफिकेट इत्यादी मूळ कागदपत्रे लघुवादक न्यायालय मुंबई यांनी ठरवून दिलेल्या अधिकाऱ्याकडे सादर करावेत.
- सदर प्रक्रियेत निवड प्रक्रियेत निवड समितीने घेतलेला निर्णय हा अंतिम असेल.
- प्राप्त करुन घेणे अनिवार्य राहील. पदभरतीच्या अनुषंगाने कोणत्याही उमेदवारास वैयक्तिक संपर्क साधण्यात येणार नाही.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
FAQ (Frequently Asked Question)
1.हि भरती कुठे आहे?
हि भरती लघुवाद न्यायालय मुंबई येथे राबविण्यात येणार आहे.
2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
विहित अर्जाचा नमुना भरून वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
3.पगार किती मिळेल?
दरमहा 69100 रुपये पर्यंत पगार मिळेल.
4.निवड कशी होईल?
परीक्षा व मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
5.अर्ज शुल्क किती आहे?
कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही
