Jilha Nyayalay Bharti 2026 : जिल्हा व सत्र न्यायालय मधील आस्थापनेवर सफाईगार संवर्गातील आणि उदकी संवर्गातील काही रिक्त पदे भरण्याकरिता भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे,सफाईगार व उदकी या दोन्ही पदाकरिता पगार देखील सातव्या वेतन आयोगानुसार देण्यात येणार आहे.
यासाठी पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज स्पीड पोस्ट व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून पाठवू नयेत, उमेदवारांनी अर्ज जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत पाठवायचे आहेत.
पदांचा तपशील
- सफाईगार
- उदकी
शैक्षणिक पात्रता
- या पदाकरिता उमेदवाराची पात्रता ही सातवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे,सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मुळे जाहिरात वाचावी.
- उमेदवाराची शरीरयष्टी सदृढ असावी जेणेकरून त्या पदावरील कर्तव्य तो पार पाडू शकेल.
- उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता,वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
पगार (District Court Bharti 2026)
- उमेदवारास पगार कमीत कमी 15000/- ते जास्तीत जास्त 47600/- दिला जाईल.
वयोमर्यादा
- उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
- जन्मतारखेचा दाखला
- उमेदवार दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला
- जातीचा दाखला
- सफाई कामाचा पूर्व अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र
- महाराष्ट्राचे आदिवास प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे
- अर्जासोबत लहान कुटुंबाबत प्रतिज्ञापत्र जोडणे गरजेचे आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 7 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय, रंग भवन चौकजवळ, सोलापूर – 413 001
नोकरीचे ठिकाण
- सोलापूर
पदसंख्या
एकूण – 03 रिक्त जागा
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवार हा भारताचा नागरिक असावा, उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात तपशीलवार वाचावी व अर्जात भरलेल्या तपशील योग्य आहे हे निश्चित करून मगच अर्ज सादर करावेत.
- उमेदवाराने एकापेक्षा अनेक कर्ज सादर केल्यास शेवटी सादर केलेला अर्ज विचारात घेतला जाईल.
- उमेदवाराचे शिक्षण सातवी पेक्षा जास्त असल्यास अर्जामध्ये नमूद करणे गरजेचे आहे, उमेदवार करार करण्यास सक्षम असावा.
- उमेदवारला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेले नसावे किंवा उमेदवाराविरुद्ध फौजदारी खटला दाखल झालेल्या नसावा, अर्ज पाठवताना पाकिटावर सफाईगार /उदकी या पदाकरिता अर्ज असे ठळक अक्षरात लिहावे.
- अर्जातील विहित जागी उमेदवाराने स्वतःचे अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराची छायाचित्र चिकटावे.
- उमेदवारांनी सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा, सदर अर्जातील माहिती स्पष्ट अक्षरात लिहावे अर्ज पूर्ण भरलेला नसेल किंवा वाचता येण्याजोगा नसेल असेल तर अर्ज रद्द केला जाईल.
- उमेदवाराचे शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच शासकीय कार्यालय अथवा न्यायालयात पूर्वी काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे, उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
FAQ
प्रश्न 1 : या भरतीत कोणती पदे उपलब्ध आहेत?
👉 सफाईगार व उदकी पदांसाठी एकूण 03 रिक्त जागा उपलब्ध आहेत.
प्रश्न 2 : शैक्षणिक पात्रता काय आहे?
👉 उमेदवार सातवी उत्तीर्ण असावा, शरीरयष्टी सदृढ असावी व मराठी-हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता यायला हवी.
प्रश्न 3 : वयोमर्यादा किती आहे?
👉 उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे व जास्तीत जास्त 43 वर्षे असावे.
प्रश्न 4 : पगार किती मिळणार आहे?
👉 सातवा वेतन आयोगानुसार ₹15,000 ते ₹47,600 पर्यंत पगार मिळणार आहे.
प्रश्न 5 : अर्ज करण्याची शेवटची तारीख व पत्ता काय आहे?
👉 अर्ज 7 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत स्पीड पोस्टने प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, रंग भवन चौकजवळ, सोलापूर – ४१३००१ येथे पाठवायचा आहे.
