Mahavitaran Bharti 2026 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत सरकारी नोकरीची संधी !! वीजतंत्री, तारतंत्री, कोपा पदाच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- वीजतंत्री – 57
- तारतंत्री – 54
- कोपा – 18
पदसंख्या
- एकूण -129 रिक्त जागा
आस्थापना नोंदणी क्रमांक
- E11162701135
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण दहावी, बारावी तसेच आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे,( सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी)
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (नोंदणीद्वारे) सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 30 मार्च 2026
वयोमर्यादा Mahavitaran Bharti 2026
- किमान 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. दि. 01.01.2025 पर्यंत 18 ते 30 वर्ष व मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष शिथील राहील.
निवड पद्धती
- उमेदवाराची निवड ही मेरीट लिस्ट नुसार होणार आहे.
आस्थापनेचे नाव
- बुलढाणा मंडळ अंतर्गत (बुलढाणा /खामगांव/ मलकापुर / मेहकर विभाग).
नोकरीचे ठिकाण
- बुलढाणा
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
◾प्रशिक्षणार्थी उमेदवारांची भरती ही केंद्र शासनाच्या (Apprenticeship) आरक्षणविषयक धोरणानुसार करण्यांत येईल.
◾उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करतांना आय. टी. आय. च्या सर्व सत्रांची, एकत्रीत गुणपत्रीका, राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र तसेच आधार कार्ड, जातीचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र ऑनलाईन सादर (Upload) करावे तसेच ऑनलाईन अर्जाची प्रत व आवश्यक स्वयंसाक्षांकीत कागदपत्रे बुलढाणा मंडळ अंतर्गत (बुलढाणा /खामगांव/ मलकापुर / मेहकर विभाग) उपरोक्त कालावधीत स्विकारले जाईल.
◾भरती प्रक्रियेत अवश्यकता भासल्यास कोणताही बदल करण्याचे किंवा संपूर्ण जाहिरात रद्द करण्याचे सर्व अधिकार निम्नस्वाक्षरीकारांस राहतील व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही.
◾प्रशिक्षण संपल्यानंतर शिकाऊ उमेदवारांना कंपनीच्या सेवेत सामावुन घेणे बंधनकारक नाही याची नोंद घ्यावी.
◾जाहिरात बदल किंवा जाहिरातीच्या काही भागात अंशतः बदल किंवा संपुर्ण जाहीरात रद्द करण्याचे अधिकार हे कंपनी राखून ठेवित आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही.
◾शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी कोणत्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न 1: ही भरती कोणासाठी आहे?
उत्तर: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत वीजतंत्री व तारतंत्री पदांसाठी भरती आहे.
प्रश्न 2: एकूण किती जागा उपलब्ध आहेत?
उत्तर: एकूण 129 जागा
प्रश्न 3: शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी/12वी + ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रश्न 4: वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: किमान 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षे; शासकीय नियमानुसार सूट लागू.
प्रश्न 5: अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
