Close Visit MahaNews12

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत “शिपाई” पदांसाठी 289 जागांसाठी मेगा भरती सुरु | PDCC Bank Bharti 2026

PDCC Bank Bharti 2026 : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाई पदांसाठी भरती नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात अली असून यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत, तरी इच्छुक आणि पात्रता धारक उमेदवाराने संपूर्ण जाहिरात वाचून लवकरात लवकर अर्ज सादर करावेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतशिपाईपदांसाठी 289 जागांसाठी मेगा भरती सुरु झाली असून उमेदवाराने लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करावेत अर्ज 4 ऑगस्ट 2026 पासून सुरु झाले असून 10 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता.

पदसंख्या PDCC Bank Bharti 2026

  • एकूण – 289 रिक्त जागा

पदांचा तपशील 

  • शिपाई

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार किमान उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एच.एस.सी. – इयत्ता १२ वी) उत्तीर्ण असावा किंवा १२ वी समकक्ष पदवीका (Diploma) उत्तीर्ण असावा.

ECHS अंतर्गत 8 वी पासवर वाहन चालक, महिला परिचर व इतर पदांसाठी बंपर भरती

अर्ज करण्याची पद्धत

  • ऑनलाइन दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करावा.
नोकरीचे ठिकाण 
  • संपूर्ण पुणे जिल्हा
अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • उमेदवारांनी अर्ज 10 ऑगस्ट 2026 पर्यंत सादर करायचे आहेत.

वयोमर्यादा

  • किमान १८ वर्षे ते कमाल ३८ वर्षे

पगार

  • निवड करण्यात आलेल्या पात्र उमेदवारांना सहा महिन्याच्या तात्पुरत्या परिविक्षाधीन (प्रोबेशनरी) कालावधीसाठी बँकेच्या सेवेत नेमणूक दिली जाईल. नेमणूक दिलेल्या उमेदवारास परिविक्षाधीन कालावधीमध्ये रू.१२,०००/- (रूपये बारा हजार फक्त) दरमहा एकवट पगार देण्यात येईल. सदर उमेदवारास नेमणूकी बाबत बँकेच्या कर्मचारी स्थायी आदेशातील व कर्मचारी सेवानियमावलीतील प्रचलित नियम, अटी व शर्ती लागू राहतील.
अधिकृत वेबसाईट
  • https://www.pdcc.bank.in/careers

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवाराने अर्जात भरलेली माहिती किंवा जोडलेली कागदपत्रे खोटी, बनावट अथवा दिशाभूल करणारी असल्याचे आढळल्यास किंवा कोणतीही महत्वाची माहिती लपवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवारांची उमेदवारी/नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येईल.
  • उमेदवारांनी भरती प्रक्रियेकामी कोणत्याही पदाधिकारी/अधिकारी यांचेकडून शिफारस / दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास सदर उमेदवारास कोणत्याही टप्प्यावर अपात्र घोषित करून निवड प्रक्रियेतून बाद केले जाईल.
  • लेखी परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीपूर्वी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलविले जाईल.
  • उमेदवारांना लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वःखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
  • यापूर्वी बँकेकडे याच पदासाठी (ऑनलाईन, ई-मेल, टपाल व हस्ते पोहोच) अर्ज केले असतील तर त्यांचे पूर्वीचे अर्ज ग्राहय धरले जाणार नाहीत. त्यांना भरती प्रक्रियेकरीता नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक राहील.
  • भरती प्रक्रियेत/निवड कार्यपद्धतीत बदल करण्याचा अधिकार बँकेस असेल व ऐनवेळी काही बदल झाल्यास तो स्थानिक वर्तमानपत्रात / बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला जाईल. याबाबत अर्ज केलेल्या उमेदवारांना वैयक्तिक स्वरुपात कळविले जाणार नाही.
  • उमेदवाराचा पुणे जिल्हयातील किमान १५ वर्षे अधिवास असणे आवश्यक आहे. पुणे जिल्हयातील मूळ रहिवासी असलेबाबत सक्षम प्राधिकरणाने दिलेला सक्षम पुरावा सादर करणे बंधनकारक राहील.
    (सन २०१८ नंतरचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate))
  • उमेदवाराची लेखी परीक्षा प्रामुख्याने पुणे शहरातील परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल. मात्र आवश्यकते नुसार जिल्हयातील इतर केंद्रावरही परीक्षा घेतली जाईल. तसेच उमेदवारांची संख्या विचारात घेऊन परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रामध्ये घेण्यात येईल.
  • उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1.ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?

शिपाई

2.शेवटची तारीख काय आहे?

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2026

3.अर्ज कसा करायचा आहे?

ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे

4.वेतन किती मिळेल?

12000 पर्यंत मासिक वेतन मिळू शकते.

5.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?

संपूर्ण पुणे जिल्हा

Leave a Comment