MBMC Recruitment 2025 : मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
मिरा भाईंदर महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम (NTEP), १५ वा वित्त आयोग (नागरी आयुष्यामन आरोग्य मंदिर) व हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अत्तर्गत करारतत्वावर ठोक मानधनावर खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांची निवड करणेकामी अर्ज करण्यासाठी कळविण्यात येत आहे.
या भरती प्रक्रिया संदर्भात पदांचा तपशील, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार व इतर सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
पदांचे नाव व तपशील
- क्षकिरण तज्ज्ञ – 01 जागा
- बालरोग तज्ज्ञ – 01 जागा
- सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ – 01 जागा
- पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 36 जागा
- साथरोग तज्ज्ञ – 01 जागा
- दंतशल्य चिकित्सक – 01 जागा
- सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक – 02 जागा
- परिचारिका (महिला) – 32 जागा
- परिचारिका (पुरुष) – 03 जागा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 04 जागा
- औषध निर्माता – 02 जागा
- प्रसवीका – 06 जागा
- औषध निर्माण अधिकारी – 01 जागा
- वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक – 01 जागा
- क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता – 01 जागा
- बहुउद्देशीय कामगार MPW (male) – 34 जागा
शैक्षणिक पात्रता व इतर निकष
उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी, यामध्ये उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 60 वर्षापर्यंत असावे.
पदसंख्या
- एकूण -130 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण
- सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता. जि. ठाणे 401101
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून ऑफलाईन पद्धतीने मिरा भाईंदर महानगरपालिका, स्व. इंदिरा गांधी भवन, मुलियाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.) ता. जि. ठाणे-401101 येथे अर्ज सादर करायचा आहे 20 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज सादर करू शकणार आहात.
मासिक वेतन (MBMC Bharti 2025)
निवड झालेल्या उमेदवाराला कमीत कमी 18 ते 75 हजार रुपये एवढे मासिक वेतन असेल याशिवाय केंद्र सरकार द्वारे मिळणारे भत्ते व इतर फायदे सुद्धा उमेदवाराला मिळणार आहेत.
अर्जाच्या शुल्कव्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क किंवा आर्थिक देवाण-घेवाण करू नये किंवा कोणी नोकरी मिळवून देतो म्हणून पैसे उकळत असेल तर अश्या भूलथापांना बाली पडू नये. या भरती विषयीची अधिक माहिती https://www.mbmc.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन तपासू शकता.
निवड प्रक्रिया
- उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- निवड करणेकामी अर्ज करण्यासाठी कळविण्यात येत आहे. जाहिरातीत पदापुढे नमूद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या तसेच इतर अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या गुणपत्रके व प्रमाणपत्रांच्या स्व साक्षांकित प्रर्तीसह दि २९/०७/२०२५ ते दि. २०/०८/२०२५ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता. जि. ठाणे ४०११०१ येथे अर्ज सादर करावेत.
- राखीव प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर प्रवर्गातील उमेदवारांना तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल, त्यामुळे सर्व प्रवर्गातील पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत पोस्टाने टपालाने अर्ज स्वीकारण्यात येतील.
- शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही अर्ज स्वीकारण्यात येतील. मात्र विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत किंवा प्राप्त होणा-या अर्जाचा भरती प्रकियेसाठी विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी
- पोस्टाने टपालाने अर्ज स्वीकारण्यात येतील. तसेच विहित मुदतीनंतर प्रास होणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत किंवा प्राप्त होणाऱ्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
FAQ (Frequently Asked Question)
1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती मीरा भाईंदर महानगरपालिका मध्ये राबविण्यात येणार आहे.
2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : विहित अर्जाचा नमुना भरून वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा 18 ते 75 हजार रुपये पर्यंत पगार मिळेल.
4.निवड कशी होईल?
Ans : परीक्षा व मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
5.अर्ज शुल्क किती आहे?
Ans : अर्जाच्या शुल्काची माहिती जाहिरातीमध्ये दिलेली नाही.
1 thought on “मीरा भाईंदर महानगरपालिकेत 130 रिक्त जागांसाठी मेगा भरती जाहीर; पगार 18 ते 75 हजार | MBMC Recruitment 2025”