Panvel Mahanagarpalika Bharti 2026 : पनवेल महानगरपालिकेत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करायचे आहेत. ही भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार असल्याने उमेदवारांनी मुलाखतीला आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत घेऊन दिलेल्या तारखेपर्यंत दिलेल्या वेळेत उपस्थित राहायचे आहे.
पदांचा तपशील
- पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
- अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
- मायक्रोबायोलॉजिस्ट
- LHV
- औषधनिर्माता
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- मानसोपचार
- स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ
- स्टाफ नर्स
- एमपीडब्ल्यू
- त्वचारोग तज्ञ
पदसंख्या Panvel Mahanagarpalika Bharti 2025
- एकूण – 52 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण
- नोकरीचे ठिकाण हे पनवेल असणार आहे.
निवड प्रक्रिया
- पात्र उमेदवाराची निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे.
मुलाखतीची तारीख
सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, १५ वा वित्त आयोग, हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व पॉलिक्लिनीक अंतर्गत कंत्राटी वैद्यकिय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट व विशेषज्ञ या रिक्त पदांकरीता थेट मुलाखतीसाठी दिनांक-१३/१२/२०२५ रोजी जाहीरात महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर व वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
तथापि, पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्राकरीता दिनांक-१५/१२/२०२५ रोजी पासून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक २०२५ जाहीर झाल्याने आदर्श आचारसंहिता लागु करण्यात आलेली आहे.
या अनुषंगाने, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, १५ वा वित्त आयोग, हिंदु हृदयसम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व पॉलिक्लिनीक अंतर्गत कंत्राटी वैद्यकिय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट व विशेषज्ञ या रिक्त पदांची दिनांक-२२/१२/२०२५ व दिनांक-२३/१२/२०२५ रोजीची नियोजीत थेट मुलाखतीचा कार्यक्रम महानगरपालिका कार्यक्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक आदर्श आचारसंहिता संपुष्ठात आल्यानंतर आयोजीत करण्यात येईल व थेट मुलाखतीचे वेळापत्रक महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
मुलाखतीचा पत्ता
- पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट- पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलण्या शेजारी पनवेल-410206.
- इतर पदांकरिता – महानगरपालिका सेक्टर 21. कामोठे, पनवेल 410206
शैक्षणिक पात्रता Panvel Municipal Corporation
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण हे पदानुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
पगार
- उमेदवाराचा पगार कमीत कमी 17,000 व जास्तीत जास्त 60,000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- उमेदवारास एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करावा.
- उमेदवार महाराष्ट्र राज्याचा आदिवासी आहे किंवा कसे हे नमूद करणे आवश्यक आहे, त्याबाबतचे विहित प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
FAQ
1.ही भरती कोणासाठी आहे?
महानगरपालिकेत नोकरी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी.
2.किती पदांसाठी भरती आहे?
52 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध.
3.शैक्षणिक पात्रता काय आहे?
जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे
4.पगार किती मिळेल?
कमीत कमी 17,000 व जास्तीत जास्त 60,000 पर्यंत पगार देण्यात येणार आहे.
5.अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
26 डिसेंबर 2025 पूर्वी अर्ज पाठवावा.
6.अर्ज पाठविण्याची पद्धत कोणती?
थेट मुलाखतीद्वारे भरती होणार आहे, त्याच ठिकाणी अर्ज भरून सादर करावा.
