ST Bus discount card 2026 : Maharashtra State Road Transport Corporation (एसटी) प्रवाशांनो लक्ष द्या! महिलांना 50% आणि ज्येष्ठांना 50% व 100% भाडे सवलतीसाठी NCMC कार्ड अनिवार्य केले आहे हे कार्ड नसेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही.
आतापर्यंत केवळ आधार कार्ड दाखवून महिलांना ५०% सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास मिळत होता. मात्र, नवीन नियमानुसार आता सवलतीचा लाभ घेण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
NCMC कार्ड म्हणजे काय?
✔️ हे एक प्री-पेड स्मार्ट कार्ड आहे
✔️ कॅशलेस प्रवासाची सुविधा देते
✔️ व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणते
✔️ भविष्यात इतर सार्वजनिक वाहतुकीतही वापरता येऊ शकते
NCMC कार्ड काढण्यासाठी इथे क्लिक करा
NCMC कार्ड कसे काढावे? (Step-by-Step Guide)
1️⃣ जवळच्या एसटी डेपोला भेट द्या
🏢 तुमच्या परिसरातील एसटी आगारातील “Smart Card” खिडकीवर जा
2️⃣ अर्ज भरा
📄 नाव, पत्ता, वय, मोबाईल नंबर अशी माहिती भरा
3️⃣ आवश्यक कागदपत्रे जोडा
- आधार कार्ड (अनिवार्य)
- विद्यार्थ्यांसाठी ‘सरल’ नंबर
- दिव्यांगांसाठी UDID कार्ड अनिवार्य
4️⃣ OTP व्हेरिफिकेशन
📲 नोंदणीकृत मोबाईलवर आलेला OTP ऑपरेटरला सांगा
5️⃣ शुल्क भरा
💰 नवीन कार्ड – १९९ रुपये
💰 जुने स्मार्ट कार्ड बदल – १४९ रुपये
6️⃣ कार्ड मिळवा
⏳ साधारण ३० दिवसांच्या आत तुमचे NCMC कार्ड तयार होईल.
महत्त्वाच्या सूचना
- कार्डमध्ये कमीत कमी १०० रुपये बॅलन्स असणे आवश्यक
- कार्ड रिचार्ज करण्यासाठी ETIM मशीन, अधिकृत वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा डेपो एजंटकडून रिचार्ज करता येईल
- लवकरच ऑनलाइन नोंदणी सुविधा उपलब्ध होऊ शकते.
- महिला आणि ज्येष्ठांनी काय करावे?
- ५०% सवलत घेणाऱ्या महिलांनी तात्काळ NCMC कार्ड काढावे
- ७५ वर्षांवरील ज्येष्ठांनीही NCMC कार्ड काढणे आवश्यक
- आधार कार्ड आता केवळ ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाईल; सवलतीसाठी NCMC कार्डच स्कॅन करावे लागेल.
